डाव जीवनाचा आणि बुद्धिबळाचा.

“माणसाचं पण असंच आहे.काही माणसं तिरसट असतात तिरकी चालतात अगदी उंटासारखी,कांही हत्ती सारखी बिचारी एक मार्गी नाकासमोर चालतात.” …इति अंकूश.

अंकुशने त्यादिवशी मला फोन केला आणि बुद्धिबळाचा डाव बरेच दिवस खेळलो नाही तेव्हा ह्या रविवारी आपल्या घरी यायची विनंती केली.
मला पण बरेच दिवस बुद्धिबळ न खेळल्याने,जरा खेळायची हूक्की आली होती.
त्याप्रमाणे मी त्याच्या घरी त्या रविवारी गेलो होतो.
बुद्धिबळाचा डाव खेळताना बरेच वेळा आम्ही एकमेकाला समसाम हरवतो.म्हणजे अंकुश दोनदा तर मी दोनदा. पण ह्यावेळेला अंकूशने मला एकदाच हरवलं आणि तिन वेळा तो माझ्याकडून हरला गेला.
मी सहज कुतूहल म्हणून अंकूशला म्हणालो,
“कायरे,आज तूझं लक्ष दिसत नाही.तुझी बुद्धि कुठेतरी दुसरीकडे व्यस्थ राहिली की काय”?
अंकुश थोडा गंभीर झालेला दिसला.मला नक्कीच वाटलं की अंकुश मला कसलं तरी तत्वज्ञान सांगण्याच्या विचारात आहे.बोल अंकूश बोल.आता डाव बंद करूया.असं मी म्हणाल्यावर,
अंकुशने बुद्धिबळाच्या सर्व सोंगट्या,राजा,वझीर,हत्ती,घोडा,उंट आणि इतर प्यादी एका खोख्यात टाकली आणि मला म्हणाला,
“ह्या बुद्धिबळाच्या खेळाच्या संदर्भातून मला तुमच्याशी चर्चा करायची आहे.
मला असं वाटतं की अखेरीस जेव्हा बुद्धिबळाचा खेळ संपायला येतो तेव्हा राजा आणि प्यादी त्याच खोक्यात येऊन पडतात.
माणसाच्या जीवनाची हीच परिस्थिती आहे.माणसाच्या जीवनपट पाहिला तर बरंच साम्य दिसतं असं माझ्या लक्षात आलं आणि मी त्याच विचारात मग्न झालो.एका मागुन एक असे विचार यायला लागले.”

“अरे,मग असं असेल तर आपण हा बुद्धिबळाचा पट गुंडाळून ठेवूया आणि तिकडे सोफ्यावर बसून ह्या विषयावर गप्पा मारूया.तुला कसं वाटतं?”
मी लागलीच अंकुशला म्हणालो.

आणि आमची चर्चेला सुरवात झाली.
मला अंकुश म्हणाला,
“मला नेहमीच असं वाटतं की,माणूस श्रीमंत असो वा गरीब,काळा असो वा गोरा,विशेषाधिकारात असो किंवा पीडीत असो शेवटी तो त्याच विस्मृतीत जातो जिथून तो आलेला असतो.मला नेहमीच वाटतं की माणसाच्या सर्व मार्गात आणि तो विश्वासून असलेल्या निरनीराळ्या पथपदावरील अस्तित्व शेवटी एकचएक असलेल्या
अनअस्तित्वात समापन होतं.”

मी अंकुशला म्हणालो,
“म्ह्णजे,तुला असं म्हणायचं आहे का की,बुद्धिबळाच्या पटलावर ज्या सोंगट्या असतात आणि खेळ खेळताना त्या जशा वागतात तशाच जवळ जवळ मनुष्याच्या जीवनपटलाशी माणसं बरोबरी करीत असतात.राजा चेक-मेट होईपर्यंत पटलावर टिकून रहातो.आणि बाकीच्या सोंगाट्या उदा.उंट,घोडा,हत्ती, वझीर वगैरे आपली चाल विशेष पद्धतिने राखून ठेवतात.”

“अगदी बरोबर”
असं अंकुश मला म्हणाला.आणि नंतर सांग्तो,
“मला नेहमीच वाटतं की उत्पतीत येण्यापासून ते जन्म घेण्यापर्यंत होत असलेली क्रिया म्हणजे मर्यादीत अस्तित्व घेऊन येणं.आणि मग त्याच्या सभोवताली असलेल्या अस्तित्वापेक्षा आपलं निराळं अस्तित्व घेऊन मग जग समजावून घेत असणं.जन्म होत असताना नियोजनाचे जे अधिकार असतात त्यांची बरोबरी कशाशीही करता येत नाही कारण त्या जन्माचं अस्तित्वच अंतिम स्थितिला येऊन पोहचण्याच्या मार्गावर असतं.म्हणजेच दुसर्‍या अर्थाने पाहिल्यास वास्तवाच्या व्याख्येचा तो शेवट असतो असं म्हटलं तरी चालेल,हे अगदी बुद्धिबळाच्या खेळाशी तसंच पटावरच्या सर्व सोंगट्याशी मिळतं जुळतं अहे.”

मी त्याच्या म्हणण्यावर आणखी काही भाष्य करणार म्हणत होतो तेव्हड्यात अंकुश मला अडवून म्हणाला,
“आज जेव्हा आपल्यातला प्रत्येक जण, एका अस्तित्वातून, प्रतिभा म्हणून लाभलेलं आणि जतन केलेलं ज्ञान आपल्यात अंतर्भूत करून घेतो,तेव्हा आपली मुल्ये,आपल्या
भूमिका आणि धारणा स्वतःत तो परिवर्तित करीत असतो.”

“आता बोला”
असं मला म्हणाल्यावर मी म्हणालो,
“हे तुझं सांगणं अगदी बुद्धिबळाच्या राजा, वझीर,घोडा,हत्ती,उंट आणि प्यादं ह्यांच्याशी अगदी मिळतं जुळतं आहे. कसं ते बघ. जेव्हा खेळातली एखादी सोंगटी एका विशिष्ट घरात येते तेव्हा त्याच्या आजुबाजूच्या सोंगट्या त्याच्यावर प्रभाव पाडत असतात.अशावेळी त्या सोंगटीला आपली मुल्ये आणि भूमिका परिवर्तित करावी लागतात.उदां. जवळपास घोडा असल्यास तो दोन सरळ आणि एक आडवं घर चाल करतो त्यावेळी त्या सोंगटीला घोड्याच्या अस्तित्वाची जाणिव ठेवावी लागते.”

अंकुश मला म्हणाला,
“माणसाचं पण असंच आहे.काही माणसं तिरसट असतात तिरकी चालतात अगदी उंटासारखी,कांही हत्ती सारखी बिचारी एक मार्गी नाकासमोर चालतात,प्याद्याच्या चाली सारखी काही माणसं हळू हळू एक एक घर चालतात, पण शेवटी डावात टिकली तर उलट्या रेषेतल्या अंतिमघरात जाऊन नव जीवन प्राप्त करून घेतात. मग ती जागा उंटाची असेल तर उंट,घोड्याची असेल तर घोडा.माणसं पण आपल्या संसारात संस्कार बाळगून जगत असली तर शेवटी चांगल्या पोझिशनला येऊन निवृत्त होतात.वझीराचं म्हणशील तर तो नेहमी आडवा तिडवा पण सरळ मार्गे चालतो पण जरूर वाटल्यास सरळ पण तिरकी वाट घेऊनही चालतो. ”

अंकुशचे एका मागून एक सांगीतलेले मुद्दे ऐकून मी थोडा भारावून गेलो.मलाही काही विचार सुचले ते मी त्यला सांगताना म्हणालो,

“मला वाटतं,सरतेशेवटी,तुम्ही काय समजता त्याने फरक पडणार नाही.मला वाटतं,
आपल्या सर्वांना मृत्यु हाच समसमान करतो.समजा एखाद्या मेलेल्या मूर्ख माणसाचं डोक्याच्या आत निरखून पाहिल्यावर एक दिसून येईल की, तो एकप्रकारे विशेषाधिकृत व्यक्तिचं चांगलंच भलं करू शकतो त्याचं कारण असं की, दोघांच्या डोक्याच्या आत काही फरक दिसत नाही.प्रत्येकाच्या डोक्यात तिच सामुग्री भरलेली असते.दोघांचा जन्मही सारखाच असतो,वाढही सारखीच होते,आणि मरणही सारखंच असतं.
आणि राजा आणि प्यादं खेळ संपल्यावर जशी त्या खोक्यात ठेवली जातात तसंच मरणानंतर तशाच “खोक्यात” त्या व्यक्ति जातात.तो राजा आणि ती प्यादी त्या खोक्यातून काढून नवा खेळ खेळण्यासाठी पटलावर मांडली जातात त्याच प्रकारे माणसांनी जन्म घेतल्यावर त्यांची निवड होऊन जीवनाच्या पटलावर त्यांना मांडलं जातं,आणि अनाकालनीय पण पद्धतशीर अशा विस्तीर्ण पटलावर मर्यादीत हालचाल आणि प्रगती करण्यासाठी ते योजनाबद्ध होतात.

ह्या जीवनाच्या खेळात फक्त काहींनाच त्यांची प्रगती प्रत्येक पाऊला- गणीक करून घेण्याची क्षमता असते. प्रयत्नाची पराकाष्टा करून त्यांना जे भावत असतं त्याची आणि एकंदरीत संपूर्ण सहचर्याची त्यांना उन्नती करायची असते. काही तर इतके सावधगीरीने रहातात की बर्‍य़ाच, प्रभावी श्रद्धा आणि रूपांकनं बाळगून असतात.

“आणि ह्याचं केवळ कारण म्हणजे,”
असं म्हणून मी अंकुशला म्हणालो,
” त्यांचा जन्म आणि निर्मिती हीच जणू जो दर्जा ते सांभाळतात त्याची मालकी ठेवण्यासाठी असते.  गम्मत म्हणजे अशा परिस्थितीत त्यांचं शारिरीक बळ ज्यांना ते विरोध करीत असतात त्यांच्यापेक्षा जेमतेम उजवं असतं.डाव संपायला येणार असेल तर फक्त पटलावरून एकएक माणूस काढून टाकला जातो. .मोठा,लहान,बारीक,उंच.
जशी ऊंट,हत्ती,राजा, वझीर लहान सहान प्यादी परत खोक्यात जातात.जिथे अंधकार आहे,तिथे विस्मरण आहे.”

आत्ताच गुंडाळलेल्या आमच्या बुद्धिबळाच्या पटलाची आठवण येऊन चर्चेचा समारोप करताना अंकुश मला म्हणाला,
खोक्यावर ढाकण लावलं जातं,जेव्हा दुसरा डाव खेळण्याची तयारी होते तशीच नवीन जीवनाची सुरवात होते. नवीन पिढीचा उदय होतो,नव्या नीत्या उदयाला येतात आणि त्या जीवन-पटलाच्या डावाच्या असित्वासाठी,जीवनाच्या नव्या व्याख्या निर्माण होऊन आपला प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नात असतात.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफरनीया)

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: