छोट्याश्या घरासमोर छोटीशी बाग.

“माझी बाग छोटीशी असल्याने माझा बागेत बराच वेळ जात नाही.त्यामुळे आणखी अनेक कामं मी निवांतपणे करीत असतो.”

सूर्यकांताने शहरात नवीन घर घेउन बरेच दिवस झाले.मला तो भेटल्यावर घर पहायला यायला नेहमीच आमंत्रण द्यायचा.
“माझ्या घरापेक्षा मी सजवलेली बाग तुम्हला आवडेल”
असं तो मला नेहमी म्हणायचा.
त्याची बाग बघून मला खूपच नवल वाटलं.कारण बाग तशी फार मोठी नव्हती.पण त्याने ज्या पद्धतीने त्यात झाडं लावली होती.ते वाखाणण्यासारखं मला वाटलं.

मला न!,घरासमोर, किंवा घराच्या मागे लहानशीच बाग असलेली आवडते.अशा लहानश्या बागेत असलेली क्षमता जी, कोणी त्या बागेची देखभाल करतो, त्याच्या बागेविषयीच्या दृष्टीकोनात परिवर्तन घडवू शकते. अशी लहानशी बाग आणखी एका कारणास्तव आवडते ज्यामुळे,त्या बागेत असलेले जवळ जवळ प्रत्येक तण उपटून काढायला शक्य होतं आणि प्रत्येक अंकूर कुसकरून किंवा चुरडून टाकता येतो.

अशी छोटीशी बाग मी माझ्या घराच्या मागे संभाळून ठेवली आहे आणि तिची देखभाल करीत आहे.मला उगाचच वाटायचं की घरासमोर किंवा घराच्या मागे भली मोठी जागा असावी आणि त्यावर भली मोठी फुलबाग किंवा फळबाग असावी.कारण शहरात मी घराच्या आजुबाजूला मोठ्या मोठ्या बागा बघीत्ल्या आहेत.त्याचच हे मनावरचं दडपण असावं.हे घर विकत घेण्यावेळी सुरवातीला बागेसाठी जागा खूपच लहान आहे असं मला वाटलं होतं.

पण ज्यावेळी माझं मन माझ्या बालपणाच्या दिवसात गेलं तेव्हा माझं मन मला माझ्या आजोळी नेईल याची खात्री होती.आणि ते अशासाठी की,माझ्या आजोळी माझ्या आजीनेसुद्धा अगदी छोटुयाश्या जागेत एक सूंदर बाग तयार केली होती.ती मला आठवण आली.माझ्या आजीने निरनीराळ्या फुलांची बाग सजवली होती.त्यात सदाफुली पासून सोनचाफ्यापर्यंत सर्व काही होतं.माझ्या आजोळच्या घरासमोर ही बाग होती.पडवीत आजीने रात्रराणी आणि साईलीची वेल लावली होती.पडवीत बसल्यावर वार्‍याच्या झुळूकेबरोबर दोन्ही फुलांचा वास मिश्रीत होऊन नाकावर आपटायचा.
शिवाय बागेत अनेक रंगाचे गुलाबाचे ताटवे,गर्द लाल-जांभळा रंग मिश्रीत फुलांची बोगेनव्हिलीची वेल अशी अनेक झाडं लावून सर्व जागा व्यापली होती.माझ्या आजीने तुळस,ओवा ह्यांचे रोपही लावले होते.ह्या झाडांची पानं चुरडल्यास हाताला निराळाच सुंगध यायचा.

आमच्या बागेची उभारणी करताना माझ्या आजीच्या बागेतले फुलांचे पराग माझ्या आत रोवले होते असावे आणि ते मोठेही झाले असावे.माझ्या आजीचा अमुल्य वारसा माझ्याकडे ठेव म्ह्णून होता असावा.हळू हळू फुलझाडं लावून त्यांची देखभाल करायला मी लागलो होतो.त्यामुळे ह्या माझ्या छोट्याश्या बागेत जे काही उगवत होतं,ते वेली सारखं पुढे पुढे जात होतं,आणि फुलपाखरांसारखं हवेत उडत होतं त्या सर्वांशी माझी शारिरीक सलगी वाढत होती.

मी एका गोष्टीचा शोध लावला होता,तो म्हणजे एक बहुमुल्य ज्ञानेंद्रियाचा अनुभव प्राप्त करण्याचा अनुभव.सकाळच्या पारी बागेत आल्यावर आणि कामावर जाण्यापूर्वी फक्त पाच मिनीटात हे होत होतं.प्रत्येक झाडाचं पान किंवा फुल कुसकरून पाहिल्यावर येणारा वास,किंवा फार सौम्यपणे परिश्रम घेऊन उचकून काढलेल्या तणातून येणारा एक सुगंध.मी प्रत्येक रोपाची काळजी घ्यायला शिकलो होतो.त्यांची वाढ होत असताना आनंद घेत होतो आणि ती कोमेजली असताना दुःख करीत होतो.बागेत फिरताना एक गोष्ट मी शिकून गेलो ती म्हणजे, फुला-फुलावरून वासासाठी आणि मधासाठी गुंजन करणारे भोंवरे पाहून,रंगीबेरंगी फुलपाखरं फुलावर बसलेली पाहून,आणि अनेक प्रकारच्या रंगीत माशा त्या वातावरणातल्या हवेत घोंघावताना पाहून घनदाट जंगलात पहायला मिळणारी भित्री हरणं आणि एडके फिरल्यासारखे भासून घेत होतो.

मी एक शोधून काढलं की,बागेत फिरताना रोजच्यारोज फुलझाडांना होणार्‍या स्पर्शातून आणि वासातून माझ्या जीवनाच्या वस्त्राची विण मी पुन्हा पुन्हा नीट विणत होतो.त्यामुळे शहरात राहूनही मला गावात राहिल्या सारखं भावत होतं.

एखादा घरमालक घरासमोर बाग पाहून बागकाम करायला आनंद घेत असतो हे काही खास टिप्पणी करण्याजोगं नाही.पण मी यातून जे शिकलो ते जरा वेगळं आहे.आणि ते म्हणजे,मी जरका केवळ देखावा म्हणून मोठं घर आणि समोर मोठी बाग घेऊन बसलो असतो तर तुर्तास थोडा भारावून गेलो असतो. आठवड्याचा शेवट पूरा बागकामात व्यथीत झाला असता.मोठी बाग सुसज्ज ठेवण्यासाठी पेस्टीसाईट्स, हरबीसाईटस,वापरून गवत कापण्याचं यंत्र वापरून,पाला पाचोळा जमवायचं यंत्र वापरून,वेळ दवडला
असता.किंवा कुणाला तरी पैसे देऊन बाग सुसज्ज ठेवली असती.अशी ही, वेळ व्यथीत करणारी आणि परक्याकडून देखभाल करून घेतली गेलली बाग माझ्याच दृष्टीतून दूरून पाहून सुखावण्यासाठी असते.जसे अलीकडे लोक गाडीच्या काचेतून किंवा टीव्ही मधून जग पहातात तशातल्याच प्रकार म्हणावा लागेल.

परंतु,माझ्या लहानश्या बागेतून बुडापासून मिळणारा अनुभव पाहून मी अशा निर्णयाला आलो आहे की,कमी प्रयत्नशील राहून आणि कमी हाशिल करून राहिल्यामुळे माझ्या छोट्याश्या बागेत मला,पहाण्यास,स्पर्श करण्यास,चव आणि वास घेण्यास भरपूर वेळ मिळतो.पुरं जीवन जगण्यासाठी वेळेची जरूरी भासत असते. माझी बाग छोटीशी असल्याने माझा बागेत बराच वेळ जात नाही.त्यामुळे आणखी अनेक कामं मी निवांतपणे करीत असतो.असा हा वेळ भरभराट करून घ्यायला आणि बढती करून घ्यायला नक्कीच उपयोगी होतो.”

सूर्यकांताला मी पाठीवर शाबासकी दिली.आणि छोट्या बागेचं महत्व मला समजावून सांगीतल्यावर मी ही खूष झालो.

श्रीक्रुष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: