सूर्य-उपासक मंदार.

“आज काहीही घडलं तरी उद्या सूर्य उगवणार हे निश्चीत.”

मंदारला,सकाळचा त्याच्या बल्कनीत येऊन,सूर्याला पाहून काहीतरी पुटपुटताना मी नेहमीच पाहिलेलं आहे. कधीतरी विचारावं की,तू सूर्याचा उपासक आहेस हे उघडच आहे.पण तू सूर्याकडे कुठच्या दृष्टीने पहातोस हे मला माहिती करून घ्यायचं असं वाटायचं.आज तुला सरळ सरळ विचारतो की,ह्या शक्तिशाली सूर्याकडे तू कोणत्या विचाराने पहातोस.निसर्गाचा एक तत्प गोळा म्ह्णून? की,उर्जा देणारी,जीवन विकसीत करणारी अत्यंत महत्वाचा निसर्गाची उपाययोजना म्हणून पहातोस.?

माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मंदार इतका खूश दिसला की त्याने सांगायला सुरवात केली,

“हे अगदी त्रीवार सत्य आहे की सूर्य हा शक्तिशाली आहे आणि त्याच्या शिवाय आपल्यापैकी कुणीही जीवन जगूच शकत नाही.तथापी,मी असं सुचित करीन की,दहा लोकांना समजा असं विचारलं की,
“सूर्य तुमच्या आयुष्यात काय भुमिका घेत असेल?”
प्रत्येकाचं उत्तर वेगळंच असणार.कदाचित कोणत्या दिवशी कुणाला हे विचाराल यावरही ते उत्तर अवलंबून असेल.माझंच उदाहरण बघा.

मे महिन्यात एखाद्या अगदी खूप उकाडा होत असलेल्या दिवशी विचाराल,जेव्हा मी आमच्या बाल्कनीत आराम खूर्चीवर बसलेला असेन तेव्हा नुकत्याच उगवलेल्या सूर्याची किरणं माझ्या अंगावर पडत असतील तेव्हा मी समजून जाईन की,ही सूर्याची किरणं मला,माझं स्वतःचं मुल्य वाढवण्यासाठी म्हणजेच माझी प्रतिमा उजळ करण्यासाठी,मला शक्ती देत आहेत.खरंच,मी सूर्य-उपासक आहे.परंतु बराच वेळ सूर्याच्या उन्हात राहिल्यावर,आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा संभव असल्याने मी माझ्या शरीराची विशेष
काळजी घेतो.पण त्याचा अर्थ त्या प्रचंड तप्त गोळ्याचा आदर मनात ठेवूनच करीत असतो.

तसंच मी योगासनं करीत असताना नियमीत केलेल्या सूर्य-नमस्कारासारख्या आसनातून मी शक्ती संपादन करीत असतो.सूर्य-भक्ती करणारे सर्व लोक ह्या सर्व शक्तिमान सूर्याबद्दल आभार दाखवण्याच्या माझ्या वृत्तीची वाखाणणीच करतील.
अलीकडे,योगातून मिळणारा व्यायाम बराच लोकप्रिय झालेला आहे.ह्या प्रचंड मोठ्या जगात जगणारे सर्व आपण त्या जगाशी एक जीव रहाण्यासाठी ह्या योगातून मिळणार्‍या व्यायामातून, ज्यांना विरंगूळा आणि जाणीव असण्याची जरूरी आहे अशाना त्यात सामावून घेऊन ती शक्ति मिळवीत असतो.
तरीपण,हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की,ही योगाभ्यासातून सूर्याच्या होणार्‍या पुजेचं मुळ हजारो वर्षापूर्वीच्या परंपरेतून आलेलं आहे.आणि म्हणूनच,मी अगदी आनंदाने माझा पूरा भरवसा त्या अत्यंत ज्ञानी पिढ्यांवर ठेवतो.खेड्यातल्या भाजी बाजारात मी जातो तेव्हा अगदी मोह पाडणारी निरनीराळी भाजी आणि फळं पाहून मी खजील होतो.
सूर्याच्या उष्णता देण्याच्या शक्तितूनच ही रंगीबेरंगी भाजी आणि फळं तयार होत असतात.आणि ती तशी तयार होण्यासाठी सूर्याचा अतीशय आदर बाळगून शेतकरी आपला घाम गाळत असतो.
उकाड्याच्या दिवसात,कचेरीत सबंध दिवस काम करून दमला भाकलेला मी जेव्हा घरी जाण्यासाठी मी माझ्या गाडी जवळ येतो तेव्हा, मी माझे डोळे किलकीले करून त्यातून उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतो.माझं डोकं सूर्याकडे कलतं करून,थोडं चेहर्‍यावर हास्य आणून पहात असताना माझ्या चटकन लक्षात येतं की माझी उर्जा मी वाढवीत आहे आणि माझं अंतर आणि आत्मा शांतीने आणि आशादयी इच्छेने भरून ठेवण्याच्या मी प्रयत्नात आहे.

जेव्हा मी माझं आयपॉड ऑन करून गाणी ऐकण्याच्या प्रयत्नात असतो,आणि हे भर सूर्यप्रकाशात फिरायला निघालो असताना,सूर्यप्रकाश माझ्या खांदा उजळ करीत असताना,एखादं सूर्यावरतीच गायलेलं भावगीत ऐकत असताना,माझ्या जीवनाला उजळ करणारा सूर्यप्रकाश असंच माझं आयुष्य उजळ करो असं वाटतं.सूर्यावर अनेक गाणी लिहीली आहेत अनेक भावगीतं गायली आहेत.पिढ्यानपिढ्या सूर्यावर लिहीणारे गीतकार,कवी सूर्यप्रकाशाचं महत्व समजून गेलेले आहेत.

सरतेशेवटी मी एव्हडंच म्हणेन की,सूर्यप्रकाशाची क्षमता मी ओळखलेली आहे.आज काहीही घडलं तरी उद्या सूर्य उगवणार हे निश्चीत.”

मंदारचं हे सर्व स्पष्टीकरण ऐकून माझं पूर्ण समाधान झालं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: