पदयात्रा काढणं.Hike

“मला स्वतःला अशा स्वैर कल्पना,भन्नाड कल्पना करायला आवडेल.” इति सुधाकर

सुधाकराला अगदी लहान असल्यापासून hiking ला जाण्याचं वेड लागलं होतं.आणि ही सवय तो त्याच्या मामाकडून शिकला.मामा पाश्चिमात्य देशात शिकला,वाढला आणि मग तिकडून सर्व सोडून देशात परत आला.
पदयात्रा काढून निसर्ग सौन्दर्य कसं अनुभवावं,ह्याची गोडी त्याने सुधाकराला लावली.
ह्यावेळी मी ठरवलं की सुधाकराला विचारावं ह्या पदयात्रेतून तू काय शिकलास?
विचारायचीच फुरसत,सुधाकराने आपले विचार सांगायला सुरवात केली.

“मला असं वाटतं की,प्रत्येकजणका पदयात्रा काढीत राहिला तर हे जग प्रत्येकाला जगण्या लायक झालं असतं.माझं म्हणणं जरा अतिच होतंय पण अगदी गंभीर होऊन सांगायचं झाल्यास प्रत्येकाने जरका ठरवलं असतं की जर का आठवड्यातल्या दिवसातला एखादा अर्धा दिवस जर काढून निसर्ग-सानिध्य साधलं असतं तरी जास्त जगण्यालायक हे जग झालं असतं.

किती मैलांची पदयात्रा काढली हे महत्वाचं नाही.त्या पदयात्रेतून काय मिळालं हे जास्त महत्वाचं ठरेल. सध्याच्या आपल्या समाज-व्यवस्थेत अगदी सर्व बाबींचा विचार करून पाहिल्यास सर्वात महत्वाचा मुद्दा वेगाबद्दल उठून दिसेल.किती लवकरात लवकर तुम्ही तुमचं काम उरकता,एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रवास करायचा झाल्यास किती त्वरेत तो केला जातो.वगैरे.

मी तर ह्या अशा गोष्टी रोजच अनुभवत असतो.मी काम उरकण्यात कसा वागतो,मी एकमेकाशी संपर्क कसा साधतो,हे सर्व दुसर्‍याबरोबर तुलना करीत करीत काम करीत असतो .ह्यामुळे काय होत असेल तर ह्या गोष्टींचा सततचा मारा होऊन होऊन दुसरं तिसरं काही होत नाही तर तणाव वाढतो.रागरंग बिघडतो,आणि गोळाबेरीज केल्यास आपण कुठेतरी अपयशी होत राहिलोय अशी भावना होऊन जाते.

मनात किती बरं वाईट वाटत असावं?जबरदस्त मेहनत घेऊन काम करीत रहावं परंतु ठरवलेली सीमारेखा गाठली न जावी,कुणाची अपेक्षा होती असावी की एव्हड्यावेळात हे काम पूर्णत्वाला यायला हवं पण,तसं न होणं.

दुसरी गोष्ट माझ्या लक्षात येते की,ज्यावेळी अशातर्‍हेनं आपण वेगवान होऊन कामाला लागतो तेव्हा निश्चितच जीवनातल्या चांगल्या गोष्टी आपण हरवून बसतो.
शाळेसारख्या ठिकाणीसुद्धा घाई गर्दीत कामं उरकून घेण्याच्या नादात शाळांमधून होऊ पहाणरी, अतिशय महत्वाची सामाजिक दृष्टीकोनातून होऊ पहाणारी, महत्वाची बाब हरवून बसतो.
जीवनातल्या सर्वच भागात हे सत्य आहे.ही सतात वेगाने जाण्याच्या अपेक्षेमुळे खरंतर अख्या जीवनाचा मुल्यांकनच कमी होऊ पहातो.दुसर्‍या अर्थाने पाहिल्यास पदयात्रा करीत राहिल्याने ही यात्रा विरंगुळा नक्कीच देते.

तुम्ही कुठल्या भागात ही पदयात्रा काढणार असाल याबद्दल मी मुळीच कदर करीत नाही.ही यात्रा तुमच्या शहरातल्या पार्क मधली असो,जवळपासच्या डोंगरीवरची असो किंवा आणखी कुठल्यातरी गावातल्या पर्वतावरची असो.एकूण परिणाम सारखाच असतो.माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगेन की,पदयात्रा करीत असताना कोणतीही,
“भरभर चालण्याची अशी पदयात्रा” नसते.हे खरं आहे की तुम्ही लवकर लवकर पदयात्रा संपवू शकता परंतु,”भरभर पावलं टाकण्याची” पदयात्रेत पद्धत नसते.

जेव्हा आपण पदयात्रा करीत असतो तेव्हा,निरनीराळे आवाज,दृश्य,गंध अशा प्रकारच्या विवीध अनुभवातून आपली सुटका नसते.एकूण अनुभव जो मिळत असतो त्यातून आपल्याला शांततेची,स्थिरचित्ततेची आठवण आल्या वाचून रहात नाही.

मला विचाराल तर कोकणात विशेषकरून मी ज्या पदयात्रा काढल्या आहेत त्यात डोंगर चढत असताना जोरदार वेगाने होणार्‍या वार्‍याचा अनुभव घेतला आहे.एका एकी कोसळणार्‍या पावसाच्या सरींचा अनुभव घेतला आहे परंतु,ती अंतरात ठाम मारून राहिलेली शांतता कदापी गमावली नाही.
मला नेहमीच वाटत असतं की ही अंतरातली शांतता ह्या पृथ्वी-तळावरील प्रत्येक व्यक्तीने उपभोगायला हवी.हा अनुभव प्रत्येकाच्या मनस्थितीत आणखी चांगली सुधारणा होईल. हा माझाच अनुभव आहे अशातला प्रकार नव्हे,पदयात्रा काढणारे सर्वच असं म्हणतात.मग ते कुठल्याही प्रांतातले असेनात का!.

ह्याचा अर्थ असा नव्हे की,ह्यामुळे सगळ्यांचच आयुष्यात बदलाव येईल.सर्वांच्याच सर्व समस्या दूर होतील.किंवा पुढे जाऊन असं ही म्हणेन की ह्यामुळे सर्व जग शांतीमय होईल.मला स्वतःला अशा स्वैर कल्पना,भन्नाड कल्पना करायला आवडेल परंतु,एक निश्चित की असा विश्वास ठेवायला हरकत नाही की तसं जर झालं तर,हे जग जीवन जगण्यासाठी नक्कीच सुखकर होईल.”

ऐकून झाल्यावर सुधाकराचे मी थॅन्क्स मानले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

 

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: