अंतरी माझ्या आनंद गवसेना

(अनुवाद)

अंतरी माझ्या आनंद गवसेना
हसावे असे वाटतां रडावे लागले
नीशी दिनीच्या यातना आजही होत्या
लपवाव्या असे वाटतां रडावे लागले

सांगावे तरी किती काय झाले असावे
तुला काही नकळे अन मी अज्ञानी असावे
एव्हडे समजले तरी बरेच समजले म्हणावे
हसण्याचा बहाणा आणूनी चेहर्‍यावरी
सत्य लपवावे असे वाटतां रडावे लागले

असे किती असतील तारे नभामधे
एक एकाला एक तारा मिळावा
नदीच्या भोंवर्‍यात नावाड्याने अडकावे
कशाला एक एकाला किनारा मिळावा
हेच मानुनी आनंदे पुढे सरकावे
डुबावे असे वाटतां रडावे लागले

जीवनभर असेच रडत रहावे
का कसे कुणी समजावून जावे
हसण्याला नसे किंमत काडीची
आंसवानी मात्र केली कदर आमुची
अंबरात येऊन मेघानी न बरसता
जावे असे वाटतां रडावे लागले.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: