दीप जळवून काय होणार आहे?

(अनुवाद)

आरशात तुझ्याच छबीवर नजर लावून
काय बसला आहेस?
एक नजर माझ्यावर टाकलीस
तर तुझं काय जाणार आहे.?

माझ्या होणार्‍या बदनामीत
तू पण सामिल आहेस
माझे किस्से माझ्याच मित्राना
सांगून तुला काय मिळणार आहे?

माझ्या समिप राहून अनोळखी
रहाण्याचा बहाणा करीत आहेस
दूर गेल्यावर हात हलवून
त्याचा काय उपयोग होणार आहे?

जीवनभर माझ्या त्रुटी पाहून मला
अस्तव्यस्त करीत आला आहेस
माझ्याच पडणार्‍या सावटीला दाखवून
मला भिववून तुला काय मिळणार अहे?

नसेन मी तुझी कुणी लागेबंधी
पण आहे असे दाखवीत आला आहेस
तुझ्या दुनियेत मला घेऊन
तुझ्यात कोणता बदल होणार आहे?

जीवनातला दुखमय प्रवास पाहून
तुझेच पाय लटपटवीत आहेस
दूर गेल्यावर हात हलवून
त्याचा काय उपयोग होणार आहे?

तहानेने गळा सुकलेला पाहून
पाण्याचा घडा दूरून दाखवित आहेस
पतंग गतप्राण झालेला असताना
दीप जळवून काय होणार आहे?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: