निसर्ग-वेडा रमाकांत

“जे आपलं खरं स्थान आहे तिथे जायला मुक्ति मिळावी म्हणून, निसर्ग, आपल्याला शांती मिळावी म्हणून, आपल्यात नम्रता आणण्याच्या प्रयत्नात असतो.”

निसर्ग-वेड्या रमाकांतला मला बरंच काही सांगायचं होतं.त्या दिवशी तो माझ्याकडे वसंत आणि श्रावण ह्या ऋतुंबद्दल बरंच काही बोलला.आजही त्याने मला आवर्जून सांगीतलं की प्रत्यक्ष निसर्गाबद्दल त्याला आणखी काही बोलायचं आहे आणि ते मी ऐकावं.

“प्रत्येकाचा निसर्गाकडून होणारा उपचारात्मक उपाय,निसर्गाकडून होणारा आपल्या तणावावरचा उपचार, आपला तणाव कमी करतो, अगदी थोडावेळ का असेना,मला हे भावतं.मनुष्याच्या मानसिकतेवर निसर्गाचा होणारा महत्वाचा परिणाम,आणि मनुष्याला निसर्गाची वाटणारी जरूरी ह्या बद्दल मला विशेष वाटतं.

जेव्हा मी दर्‍या खोर्‍यातून पायी प्रवास करीत असतो,तेव्हा निसर्गाने चितारलेले हिरवे रंग आणि रंगीबेरंगी पिवळे, लाल रंग बघतो,त्यामुळे माझ्या नक्कीच ध्यानात येतं की,मी-मी म्हणणार्‍या माझ्यापेक्षा, त्या गावरानात नक्कीच जास्त काहीतरी आहे आणि खरं जग तिथेच आहे.माझ्या मनात असलेला तणाव रोजचाच आहे,पण हा तणाव एकएकी संपूर्णपणे वितळला जातो जेव्हा माझ्या लक्षात येतं की जीवन आणि जगणं याला काही अर्थ उरलेला नाही.

निसर्ग,त्याची क्षमता वापरून,आपल्या स्वतःला आणि आपल्या जगण्याला आपल्या जीवनातू सोडवणूक करतो.म्हणजेच निसर्ग सानिध्यात जाऊन रहाणं याचाच अर्थ माणूस म्हणजकाय ह्याचा उलगडा होणं.बरेच वेळा मी माझ्या जीवनात भारावून गेलेलो आहे.तसंच माझं मन त्रस्तही झालेलं आहे.मात्र एक नक्की की, अशावेळी मी पदयात्रा काढून बाहेर निसर्ग सानिध्यात राहून ह्या कठणायीवर मात केली आहे.

खरं सांगायचं तर अशावेळी समुद्राच्या सानिध्यात रहाण्याचा मी जास्त प्रयत्न केला आहे.समुद्राजवळ जाण्यासाठी मला डोंगर उतरून सपाटीवर यावं लागलं आहे आणि अशावेळी डोंगराच्या उंचीवरून खाली न्याहळताना शेतातले हिरवे कुणगे आणि गाई,बैलांसारखी गुरं चरताना पाहून मन खूप आनंदी होतं.आणि एका विशिष्ठ जागेवरून फेसाळणार्‍या समुद्राच्या लाटा दिसायला लागल्या की सगळे तणाव नाहिसे होतात.सर्व जगच विसरायला होतं.पुढे काय होणार ह्याचे विचार,सध्या असलेल्या कामावरच्या कटकटी, नातीगोती सर्व सर्व विसरायला होतं.मी किती जरी ह्या घटनेचं वर्णन केलं तरी ते आपुरंच पडेल.

उंच उंच झाडं असलेल्या रानात,सूर्य प्रकाशाने झगमगलेल्या दर्‍यांत,हिरव्या गार मळ्यात अशा जगात मला खरी शांती मिळते,बोध मिळतो.ही जागा अशी आहे की,माझ्या जीवनात येत असलेले सगळे घोळ एकाएकी वितळून जातात,शिवाय माझ्या लक्षात येतं की, इथे माझं अस्तीत्व आहे,अर्थात मी जीवंत आहे आणि ह्या विश्वाचा मी एक भाग आहे,निसर्ग आपल्यावर उपचारात्मक इलाज प्रदान करण्याच्या प्रक्रियेत असतो हे मला भावतं.

ह्या असल्या नैसर्गीक उपचारामुळे मनुष्य निर्मीत तणावाची बंधनं आणि उत्कंठासारख्या गोष्टी मनुष्याच्या जीवनात संगत देत असतात त्यांच्या पासून सोडवणूक होते.
मला वाटतं,जे आपलं खरं स्थान आहे तिथे जायला मुक्ति मिळावी म्हणून, निसर्ग, आपल्याला शांती मिळावी म्हणून, आपल्यात नम्रता आणण्याच्या प्रयत्नात असतो.”

मला, निसर्गाच्या ह्या बाजूबद्दल खूपच माहिती रमाकंतकडून कळली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

 

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: