जलेने वाले जला करे

आता सगळीकडे जाहिर झाले आहे
की तुच मला प्रेमात पाडले आहे
आपली जेव्हा नजरा नजर झाली
तूच प्रथम पाहिलेस खाली

हा होता तुझा पाहून नखरा
दिसे ना मला आता किनारा
दिसतील तुझे हे बहाणे
समजतील सर्व शहाणे

हसतात नभातील सर्व तारे
का करिशी हे सर्व सारे
पुसेल मला हा सारा जमाना
काय मी सांगू आता त्याना

लाजून म्हणशील तेच पुन्हा
प्रीत कराया कसला गुन्हा
राहू देत हे रहस्य असेच बरे
जलने वाले जला करे

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: