विश्वासराव तत्ववादी

विश्वासराव माझा जुना दोस्त.शाळकरी दोस्त म्हटलं तरी चालेल.त्याला मी गमतीने विश्वासराव तत्ववादी म्हणायचो.आणि त्याचं कारणही तसंच होतं.भेटेन त्यावेळी त्याचं काहीना काहीतरी विषयावरून जीवनात येणार्‍या अडीअडचणीना तोंड कसं द्यावं,जीवन म्हणजेतरी काय असतं,यश-अपयश ह्याचा जीवनात मायना काय असतो अशा काहीतरी विषयावर बोलायला त्याला “लय” आवडायच्या.

ह्यावेळी आमची भेट झाली त्यावेळी त्याने मला जीवनातल्या काळा विषयी आपली मतं सांगीतली.तो सांगतो ते ऐकायला मला नक्कीच बरं वाटतं.

मला म्हणाला,
“कुणीही आपला भूतकाळ बदलू शकत नाही.शिवाय,वर्तमान काळ बरबाद करायचा असेल तर, भविष्यकाळाबद्दल उगाचच खंत करत बसणं.जे काय होणार आहे त्याबद्दल आपण सर्वस्वी अज्ञान असतो.मला असं नेहमी वाटतं की,भूतकाळाबद्दल आणि भविष्यकाळाबद्दल खंत करत बसणं म्हणजे निरर्थक स्वतःचीच उर्जा वाया घालवणं असं होईल.कारण दोनही गोष्टी अस्तित्वातच नसतात.

जेव्हा मी भूतकाळात चुकीचे निर्णय घेतले होते त्या निर्ण्यांचा जरा अतिच विचार करीत होतो,तेव्हा मी माझ्या भविष्यकाळाबद्दलही थोडा चिंताकूल होतो.पण कमनशिबाने त्या परिस्थितीमधे सामिल व्हायला माझा मीच कारण होतो.परंतु,खरं पाहिलं तर अशी परिस्थिती नेहमीच यायची. जास्त करून ह्या घटना मी ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळी घडलेल्या आहेत.त्याचं मुख्य कारण त्या घटना शिक्षणाशी संबंधीत होत्या.तसंच भविष्यातल्या संधी आत्मसात करण्याच्या संबंधाने होत्या.शिवाय भुतकाळातल्या आठवणीही त्याला कारणीभूत होत्या.

शाळेला शिक्षणाबद्दलच्या जबाबदार्‍या पार पाडायच्या असतात,त्यातून भविष्यकाळात विद्यार्थ्याना आयुष्यभरच्या येऊ घातलेल्या परवण्या आत्मसात करायच्या असतात आणि त्याबरोबर शाळा ही अशी जागा आहे की जिथे शिक्षक सतत तुमच्याकडून काम करून घेण्यासाठी तुमच्या मागे लागलेले असतात.आणि हे सर्व करून घेण्याची तत्परता दाखवली नाहीत तर त्याचा अंत सहजिकच तुम्हाला अयशस्वी होण्यात होतो.मग काय,अयशस्वी होणं म्हणजेच चांगल्या भविष्य काळाला दुरावणं.त्याची परिणीती सुख गमविण्यात होणारच. ह्या सर्व गोष्टींचं मला आश्चर्य वाटायचं.मला वाटायचं मला जे व्हायचं आहे ते मी होईन का? मी यशस्वी होईन का?

आणि ह्यात भर म्हणजे,शाळा ही अशी जागा आहे की,त्यावेळी अनुभवातून मिळालेल्या भूतकाळातल्या आठवणी आणि त्यावेळी घेतले गेलेले निर्णय साठवलेले असतात.मला ह्यावेळी नक्कीच आठवतं की,मी कशा त्यावेळी मुर्खासारखे निर्णय घेतले होते.माझ्या लक्षात येतं की मी माझा गतकाळा कसा नासावला होता.कधी कधी मी विचार करायचो की,माझ्या गतकाळाची पुनरावृत्ती करून पहावी.मी माझ्या मलाच मूर्ख आणि पराजीत समजायचो.मी मला म्हणायचो की का बरं मी असे मुर्ख निर्णय घ्यायचो.

एव्हडं मात्र खरं की,माझ्या मनात सतत होणारी दोषीपणाची भावना आणि मनात सतत येणार्‍या विवंचना मला कुठेही किनारा दाखवायला कारणीभूत होणार नाहीत.झालंच तर,माझा वर्तमान बिघडवून टाकतील. माझ्या एक लक्षात आलं की,काही योजना प्रस्थापीत करायला नेहमीच गतकाळाकडे पहाण्याची जरूरी नाही.बरेचवेळा दीर्घ श्वास घ्यावा लागतो,विश्वास ठेवावा लागतो,जाऊ दे असं म्हणावं लागतं आणि पुढे काय होणार आहे ह्याची प्रतिक्षा करावी लागते.मी हे माझ्या भविष्यासाठी लागू करणार नाही.कारण भविष्याबद्दल विवंचनेत राहणं म्हणजे निष्फळ प्रयत्न आहे.माझ्याकडे जे रहाणार आहे ते म्हणजे गत काळातल्या आठवणी फक्त.”

 

विश्वासरावाचं हे सर्व तत्वज्ञान ऐकल्यावर मी त्याला म्हणालो,
“कितीही गतकाळाची दोषीपणाची भावना मनात ठेवली तरी गतकाळ बदलणार नाही आणि कितीही भविष्यकाळाबद्दल विवंचना मनात ठेवली तरी भविष्यकाळ काही बदलला जाणार नाही.तेहा मागेवळून गतकाळाकडे का बरं पहावं? ते घडून गेलेलं आहे ना! त्यामुळे आपलाच वेळ निघून जातो.शिवाय,बर्‍याच गतकाळातील गोष्टीबद्दल विवंचनेत राहूनही त्या गोष्टी प्रत्यक्षात होत नाहीत.
शेवटी मी एव्हडच म्हणेन की,गतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल विवंचनेत रहाणं म्हणजे भावूक उर्जा निरर्थक कामी लावणं कारण दोनही गोष्टी अस्तित्वातच नसतात.”
त्याच्या चेहर्‍यावरून तरी मला असं वाटलं की माझं म्हणणं त्याला पटलं असावं.

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: