ये ये तू माझ्या संगे ये

(अनुवाद)

ये ये तू माझ्या संगे ये
माझ्या अंतराची धडकन
तू न मी क्षणो क्षणी हरएक क्षणी
ये ये तू माझ्या संगे ये
तुझ्यासंगे आहे सर्व काही
हरएक क्षणी मी सडा एकाकी
ये ये तू माझ्या संगे ये
लाडक्या कविते ये संग ये

एकच आशा माझ्या मनी
पाहिन तुजला जीवनभरी
नयनी तुजला सामावूनी
हरवून जाईन स्वप्नांतरी
सात सूरांच्या झुल्यामधे
संगे तुझ्या क्षणो क्षणी
लाडक्या कविते ये संग ये

चुरून फुलांचा सुगंध दरवळे
दरवळे महक तुझ्या अंगातूनी
काळ्या मेघानी टाकला पिऊनी
रस तुझ्या अधरा मधूनी
लाल रंग तुझ्या गालावरचा
लज्जेचा अर्थ समजायचा
ये ये तू माझ्या संगे ये
लाडक्या कविते ये संग ये

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: