अंतरीच्या अंधार्‍या रात्री

(अनुवाद)

अंतरीच्या अंधार्‍या रात्री अंतराला आनंदी ठेवू नको
उगवेल पहाट खचित वाट पाहणे सोडू नको

वेदनेच्या खर्‍या जगण्यात नसे कसली सीमा
नको फसवू अंतराला धीर अंतराचा सोडू नको
नको होऊ संशयी विश्वास मनातला सोडू नको
उगवेल पहाट खचित वाट पाहणे सोडू नको
अंतरीच्या अंधेर्‍या रात्री अंतराला आनंदी ठेवू नको

उत्कंठेच्या मार्गी जाऊन अंतराने साद देऊन
काय मिळविले
अग्नीशी खेळत राहणाऱ्या आम्हा प्रेमाशी प्रतारणेने
काय मिळविले
अंतराचा अग्नी न विजविता तिज संगे प्रीत कर

उगवेल पहाट खचित वाट पाहणे सोडू नको
अंतरीच्या अंधेर्‍या रात्री अंतराला आनंदी ठेवू नको

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: