क्षणो क्षणी हर क्षणी

(अनुवाद)

क्षणो क्षणी हर क्षणी माझ्या
अंतरंगी तू सदैव वास करीतेस
जीवन एक खुप गोड तृष्णा
असेही तू मला सदैव सांगतेस
रोज रोज सांजवेळी नयनावर
तुझा पदर लहरत असतो
रोज रोज काळोखी रात्र
आठवांची चिंब बरसात करीते

मी दीर्घ श्वास घेत रहातो
गंध तुझा हवेत परमळतो
एक सुगंधित संदेश मिळतो
माझ्या अंतरंगाची धडधड
तुझीच गोड गाणी गाते

क्षणो क्षणी हर क्षणी माझ्या
अंतरंगी तू सदैव वास करीतेस
तू विचारात पडशील का बरे
माझ्यावर एव्हडी प्रीत करावी

तुझी समज होईल मी खुळा
एक तुझा विचार स्विकारीन
खुळ्यांचे विचार खुळेच जाणतात
जळून खाक होण्याची ती मजा
काय ते फक्त पतंगच जाणतात

तु ही असाच जळत रहा येऊनी
माझ्या समिप दीर्घ स्वप्नामधे
क्षणो क्षणी हर क्षणी अंतरंगी
माझ्या तू सदैव वास करीतेस
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: