अशा ह्या क्षणी

(अनुवाद)

लाजून अशी नको बघूस अशा ह्या क्षणी
कुतूहलाच्या इराद्याने
आता वृत्त पसरेल चोहिकडे अशा ह्या क्षणी
नजरेतल्या इशार्‍याने

तुझ्या मोहक चेहर्‍याचे चित्र घेतले ह्या क्षणी
माझ्या नजरेने
विसर दुनीयेला ये मिठीत अशा ह्या क्षणी
हा आर्त आवाज विनवीतो अशा ह्या क्षणी
वचनाच्या पुर्ततेने

अंतरंगा! कसली तमा करू फलिताची अशा ह्या क्षणी
दिसेल अपुल्या प्रीतिवरती जुलूम झाला अशा ह्या क्षणी
शिक्षेच्या सुनावणीने

लाजून अशी नको बघूस अशा ह्या क्षणी
कुतूहलाच्या इराद्याने

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: