माझे प्रेम मला परत दे

(अनुवाद)
ती माझी निद्रा ती माझी मौज मला परत दे
ती माझी प्रीत ती माझी व्यथा मला परत दे
माझी निद्रा मी जेव्हडी घालवून बसलो
माझी मौज मी जेव्हडी हरवून बसलो
ती माझी निद्रा ती  माझी मौज मला परत दे
ती माझी प्रीत ती माझी व्यथा मला परत दे

 
एक भोळे ह्रदय आहे अन जुलूम आहेत कितीतरी
एक सोवळी प्रीत आहे अन व्यथा आहेत कितीतरी
माझ्या प्रेमाची कसोटी नको कधी पाहू
मी पाहिली आहेत अगणित स्वप्ने
मला आठवतात अगणित आठवणी
ती मांझी स्वप्ने माझी आठव मला परत दे
ती माझी निद्रा माझी मौज मला परत दे

 
तुझ्यावर प्रीत करून केली मोठी चूक
न मिळणार्‍या प्रेमाची होती मला भूक
अशी कशी भंगली माझी निष्टा
अशी कशी मिळाली मला सजा
तुझ्या हव्यासाची तृष्णा होती मला
तुझा अपहार करण्याची उमेद होती मला
ती माझी तृष्णा माझी उमेद मला परत दे
ती माझी निद्रा ती मीझी मौज मला परत दे

 
ती माझी प्रीत ती माझी व्यथा मला परत दे
माझी निद्रा मी जेव्हडी घालवून बसलो
माझी मौज मी जेव्हडी हरवून बसलो
ती माझी निद्रा ती माझी मौज मला परत दे
ती माझी प्रीत ती माझी व्यथा मला परत दे

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: