हे मना

(अनुवाद)

रमत गमत हसत हसत
गुणगुणत चल हे मना
हे मना तू होऊनी मग्न
चल सजवित घेऊनी स्वप्न
रमत गमत हसत हसत
गुणगुणत चल हे मना

 

फुलांनी भरलेल्या ह्या डहाळ्या
सुगंधी सुगंधी ह्या पाकळ्या
कळ्या दिसती नाजुक कोवळ्या
नजरेत भरूनी हसत हसत चल
हे मना तू होऊनी मग्न
चल सजवित घेऊनी स्वप्न

 
अवसर मिळाला चांगला
ऊठला दु:खाचा पहारा
आशेच्या ह्या धरतीवर
दुनीया निर्माण करीत चल
हे मना तू होऊनी मग्न
चल सजवित घेऊनी स्वप्न

 
श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोर्निया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: