भोग आणि प्रेम

“हे विश्व एव्हडं मोठं आहे की,ते स्वतःच एक चमत्कार आहे.हा चमत्कार समजायला एकच मार्ग नसणार.”..कुणीतरी म्हटलंय.

रमाकांतचं वाचन दाणगं आहे.त्याची बैठकीची खोली असंख्य पुस्तकानी भरलेली आहे.मी एकदा त्याला सहज म्हणालो,
“कायरे रमाकांता तुझ्या खोलीत एव्हडी पुस्तकं आहे तू खरोखरच ती उघडून वाचतोस का?”
माझा प्रश्न रमाकांतला विचीत्र वाटला नाही.कारण हा प्रश्न त्याला अनेकानी विचारलेला आहे हे त्याच्या हसण्यावरून मला कळलं.मला म्हणाला,
“अरे,त्यातूनच मला काहीतरी लिहिण्याच्या कल्पना सुचतात.पुस्तक वाचताना लेखक आपल्याशी बोलत असतो.ते बोलणं एकतर्फी असतं.पण वाचकाला त्या लेखकाकडून अनेक उत्तरे शोधून मिळतात.”

पुढे रमाकांत सांगू लागला,
“प्रत्येकाच्या अंगात काही ना काही तरी कला आणि ज्ञान असतंच असतं.असं असतानाही आपल्याला खरा माणूस म्हणण्याचं कारण असं असेल की,आपण इतरांशी कसे वागतो,त्याच्याशी कसा संबंध ठेवतो, यावर अवलंबून आहे.प्रसिद्ध इतिहासकार जाणतात की,जीवनभर ज्ञान मिळण्यासाठी आयु्ष्यात येणारे भोग नुसतेच अपरिहार्य नसतात तर अनिवार्यही असतात.”

खरं काय आणि खोटं काय ह्या प्रश्नाचा उहापोह करताना रमाकांत पुढे सांगू लागला,

“मला असं वाटतं की,काही लोकांना काही गोष्टी ठाऊक असतात.पण मला म्हणायचं आहे की ह्या ठाऊक असणार्‍या गोष्टी ठाऊक असणं हे कुणालाही फरक करील अशातला भाग नाही.एखादा चांगला गणित-तज्ञ अंका विषयी,आकड्या विषीयी खरं काय ते समजायला ज्ञात असेल,आणि एखादा चांगला इंन्जीनियर पदार्थसंबंधाने शक्तीचा वापर करून स्वतःला हवं असलेलं उद्दिष्ट मिळवू शकेल.
परंतु,इंजीनियर काय किंवा गणित-तज्ञ काय ते प्रथम माणूस असतात.तेंव्हा त्यांना काय किंवा मला काय जास्त जास्त भावतं ते फक्त ज्ञान नाही किंवा अंगी असलेलं कसब नाही तर त्यांचं इतर माणसांशी असलेले संबंध महत्वाचे असतात.कुणालाही इंजीनियर किंवा गणित -तज्ञ असण्याची गरज नाही उलट दुसर्‍याशी कसे संबंध ठेवून रहायला हवं हे माहित पाहिजे.

आणि आपले हे एकमेकाबरोबरचे संबंध जे जीवनात खूप महत्वाचे असातात पण तेव्हडेच ते ठेवणं फार कठीण असतं,कारण इथेच कळायला बरं वाटतं की खरं काय आणि खोटं हे कळायची जरूरी असते.मला नेहमीच असं वाटतं की,खरं काय आणि खोटं काय ह्याची खात्रीलायक माहिती आपल्याला नसते.आणि जरी ती असली तरी मला असं वाटतं की,ते शोधून काढणं इतकं कठिण असतं की आपल्या स्वतःच्या रुची प्रमाणे आणि स्वतःचा कल असल्या प्रमाणे आपलं खरं आहे असं सहाजिक वाटत असताना,खरं नक्कीच काय आहे ह्या बद्दल आपली खात्री व्हावयास हवी.

प्रत्यक्षात,आपल्या मनात आपल्याला उत्तम धारणा असली पाहिजे की खरंच खरं काय आहे त्याबद्दल. आणि त्यानंतर त्यावर पैज लावून कृती केली पाहिजे आणि असं करीत असताना तीळभर ही मनात आलं नाही पाहिजे की आपण म्हणतो तेच खरं आहे.
खरं खरं काय आहे ह्याची आपल्याला खात्री नसताना आपलं मन मोकळं असायला हवं.आणि कुणी आपलं प्रबोधन जरी केलं तरी ते ऐकायला आपलं मन मोकळं असायला हवं.कारण आपण म्हणतो ते खरं ही नसावं. पण त्याचवेळी आपल्याला दृढनिश्चयी आणि उत्साहपूर्ण ही असायला हवं,जेणेकरून आपला प्रयत्न वास्तविक असणं भाग आहे.
मला तरी असं वाटतं की,खरं सिद्ध करण्यासाठी वास्तविकता विनयशिलता आणि मन उदार ठेवून जे खरं आहे ते करण्यासाठी प्रयत्नशिल असणं.आणि त्याहूनही कठीण असतं की खरं करून दाखवणं.कारण असं करीत असताना कदाचित आपल्याला आपल्याशीच झुंज देण्यात प्रयत्नशील असाण्य़ात भाग पडावं लागेल.

खरं करून दाखवण्याच्या प्रयत्नात आपल्याला आपल्याशी झूंज द्यावी लागते.कारण स्वभावतःच आपण प्रत्येकजण अशा तर्‍हेने वागतो आणि अशा तर्‍हेने विचार करतो की जणू आपणच सर्व काही आहो.पण मला विचाराल तर मी काही तसा नाही.आणि तसं मनात जरी मी आणलं तरी मी चुकीचा होऊ शकतो.
म्हणजेच प्रत्येकाला स्वतःशीच झूंज सतत द्यावी लागते.आणि ह्याचाच अर्थ असा होतो की,जीवनात व्यथा सहन करणं हे नुसतच अपरिहार्य नाही तर ते अनिवार्य आहे.फक्त ह्या धारणेतून आपलं हित कसं ते साधलं पाहिजे हेच जीवनात शिकलं पाहिजे.

माझ्या मनात असाही विचार येतो की,सर्वथा आपलीच जीत व्हायला हवी असल्यास त्याला किंमत मोजावी लागते.आणि ही माझी धारणा कुठून आली हे ही मला ठाऊक आहे.एखादा अपघाताने का होईना कुठल्या धर्मात जन्म घेतो आणि कुठल्या देशात जन्म घेतो ह्यातून ही धारणा येत असावी.

आणखी एक माझी धारणा धर्माला कारण ठरवते.आणि ते म्हणजे धर्माची श्रद्धा असते की,प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की ती जीवनाला अर्थ देते आणि जीवनाला उद्दिष्ट देते.आणि दुसरं म्हणजे जीवनातले भोग लाभदायक होतात जेव्हा प्रेमाचं त्याला अग्रगण्य असतं.
सर्व धर्म असंच चांगलं चांगलं सांगत असतात.तेव्हा अमूक एकच धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणणं खरं ठरणार नाही.कुणी तरी म्हटलंय,
“हे विश्व एव्हडं मोठं आहे की,ते स्वतःच एक चमत्कार आहे.हा चमत्कार समजायला एकच मार्ग नसणार.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: