संशयी मना कसे सांगू मी तिला

(अनुवाद)

मन भरून कसे पाहू मी तुला
संशयी मना कसे सांगू मी तिला
तू माझी कसे तुला मी म्हणू
सार्‍य़ा जगाला कसे मी पटवू
मन भरून कसे मी तुला पाहू

उताविळ तू अन बेचैन मी
तुला भेटण्या उत्कंठा वाढली
संयमाची सीमा आता संपली
दाह प्रीतिचा अंग जाळू लागली
आज भेटीची घडी का चुकली
भासे ह्रदयाची धडधड बंद पडली

अशी हसतमुख तुला पाहुनी
भाग्य जीवनाचे उद्या येईल
मन भरून कसे पाहू मी तुला
संशयी मना कसे सांगू मी तिला

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: