कसे विसरीन मी तुला सहजपणे असा

(अनुवाद)

तुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी
असे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले
रहा तू हवे तिकडे तू एकच माझा सखा
कसे विसरीन मी तुला सहजपणे असा

पदो पदी केली पुजा माझ्या सख्याने
अन रडविले मला बहरलेल्या फुलांनी
तुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी
असे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले

माझ्या नजरेत मला भासे
दिवस जणू आहे अंधारी रात्र
सावट माझी संगे माझ्या मात्र
रहा तू हवे तिकडे तू एकच माझा सखा
कसे विसरीन मी तुला सहजपणे असा

आठवणी सख्याच्या माझ्या अंतराच्या दर्पणावर
तोडूनी ह्रदयाला एकटे रहाणे आले माझ्यावर
तुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी
असे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले
श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोर्निया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: