Monthly Archives: डिसेंबर 2018

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

१ जानेवारी २००७ पासून मी माझा “कृष्ण उवाच” हा ब्लॉग लिहायला घेतला. ह्या वर्ष अखेर बारा वर्ष होतील ह्या लिखाणाला. गेली बारा वर्ष मी ह्या ब्लॉगवर सातत्याने लिहीत आलो आहे. हा एक-हजारावा पोस्ट मी माझ्या मुलीला समर्पण करीत आहे. (माझे मित्र श्री.डोंगरे ह्यानी अलीकडेच मला एक लेख पाठवला होता.त्याचं शिर्षक होतं “*’परदेशस्थ’ मुलीचं पत्र* थोडक्यात […]

मला सुपूर्द करशील का

(अनुवाद) तू तुझ्या अंतरातले दु:ख तुझी तळमळ मला सुपूर्द करशील का शपथ त्या दु:खाची तुला तुझ्या ह्रदयाची एकाकीपणाची व्यथा मला सुपूर्द करशील का मानिले जरी मी नसेन तुझ्या मर्जीतला कसली हरकत देण्यात तुझे दु:ख अन वेदना कळुदे मला तुझी होणारी जनातली छळणूक एका अंतराला भासणारी तुझी देखरेख मला सुपूर्द करशील का ज्या ह्रदयात जागा हवी […]

असू वा नसू

(अनुवाद) आम्ही असू वा नसू सुगंधाने दरवळत राहू फुलांच्या कळ्या बनून पहाटेचा वारा बनून ऋुतू कुठला का असेना रंग-रुप होऊनी ह्या बगिच्यामधे हवा हवा असा सुगंध घेऊन ऊडवून देऊ केशपाशातून शिशिरात अथवा वसंतात डुलत डुलत फुलत फुलत बहरत्या कळ्यांच्या स्वरूपात कळ्या बनून फुलत फुलत राहू हरवलो असे जणू आम्ही भेटलो वा दूरावलो होणार नाही ह्रुदय […]

नसे तुलाच ठाऊक

(अनुवाद) नसे तुलाच ठाऊक कुठल्या जगात तू भ्रमंती करीत आहे मी तर ह्या भरल्या जगात एकटा एकांतात झुरत आहे नसे तुलाच ठाऊक कुठल्या जगात तू भ्रमंती करीत आहे एकच जन्म अन लाखों व्यथा दम गायब अन घुसमट सर्वथा डुबलेल्या तुझ्या आसवांनी ये निरखूदे तुझ्या नेत्रांना लुटून माझे सर्व जीवन बसलीस कुठे तू छपून मरण येत […]

विस्मरलेल्या कहाण्यांनो

(अनुवाद) विस्मरलेल्या कहाण्यांनो याल का पुन:श्च तुम्ही माझ्या स्मरणात आता नजरे समोर घन दिसू लागले पुन:श्च कुठून आल्या त्या विस्मरलेल्या काही परछाया ती गाईलेली अवीट गीतें ती दूरावलेली गंभीर स्मरणें ती काही अर्थहीन गीतें झाली अर्थहीन तरी होती अपुली लज्जित झाल्या नजरा आठवूनी विस्मरलेल्या कहाण्यंनो याल का पुन:श्च तुम्ही माझ्या स्मरणात खुप विलासी तो काळ […]

काय सांगू न कळे

जगदीशसिंग आणि चित्रासिंग यांच्या एका गझलीचा (अनुवाद) चि: तू अन तू आहेस माझ्या अंतरात अंतरी उपचार कोणता करूं जग: अंतरंग तू अन अंत:प्राण ही तू बलिदान करण्याविना काय करूं दो: तू अन तू आहेस माझ्या अंतरात अंतरी उपचार कोणता करूं चि: गमवूनी मजला मिळवूनी तुला काय काय लाभले काय सांगू तुला होऊनी तुझी जीवनी माझ्या […]

तू प्रेम कर अथवा द्वेष कर

  (अनुवाद) तू प्रेम कर अथवा द्वेष कर नेहमीच आम्ही तुझे प्रेमवेड्यापैकी हवं तर नको आम्हा जवळ करूस पण नको समजूस अनोळख्यापैकी   मरणाला अमुचा नसे नकार जगत आहो फक्त इच्छा समजून तुझ्या लिहीलेल्या उपन्यासात नाव अमुचे येईल कदापी चुकून तू प्रेम कर अथवा द्वेष कर नेहमीच आम्ही तुझे प्रेमवेड्यापैकी   भेटू आपण जरा जपून […]

जीवन जगत असताना सुखाने जगावं.

  सुधाकर बरेच दिवसानी मला भेटला.आम्ही दोघे भेटलो की काही भाववाचक कल्पनेत मश्गुल होऊन बोलत असतो.आढेवेढे न घेता सुधाकर मला म्हणाला “आज मला बोलू द्या” “मला वाटतं जसं जसं माझं वय वाढत चाललंय म्हणजे खरं तर माझं वय पन्नाशीच्या जवळ यायला लागलंय.तसं तसं माझ्या सम-वयाच्या लोकांच्या मनांत जसा विचार येत रहातो तसाच काहीसा माझ्याही मनांत […]

दिवस असती जणू पांखरे

  (अनुवाद) विसरू कसे मी गेलेले दिवस ते वाटे त्या दिवसानी पुन:श्च यावे वाटे असे आधिक्याने मम अंतरी   दिवस असती जणू पांखरे पिंजर्‍यात ती राहिली असती सदैव मी पाळीली असती दाणे देऊनी निगा केली असती घट्ट मिठीत घेतली असती   लपवूनी त्यांची तस्वीर मनमाने ठेविली असती मनी फुललेली ही तस्वीर कदापी फुसून गेली नसती […]

हे तेच उपवन जिथे बहरती फुले

(अनुवाद)   स्मरण घडले अंतरातून अन क्षीण लहर ऊसळली थंडाव्यातून प्रीतिची जखम ऊभारून आली अंतरातून सहज आठवण आली स्मरतात ते दिवस अजूनी स्थिरलो होतो अंतरात कधी अन हसून हसून आलिंगनात गुरफटलो होतो तरी कधी खेळता खेळता जीवावर बेतले कधी प्रीतिची जखम ऊभारून आली कधी काय सांगू दीपकाच्या प्राक्तनाचे जळण्याविना उरते शल्य प्रीतिचे हे तेच उपवन […]