दुःखाला सुख कसे मी म्हणू

(अनुवाद)

बोलू द्या मला अंतरातून माझ्या
वा राहू दे मला माझा मी मुका
दुःखाला सुख कसे मी म्हणू
म्हणुद्य़ा त्यांना जे म्हणतील तसे

 
कसे ऊमलले हे फुल उपवनामधे
प्रीत नसे माळ्याच्या नयानामधे
हसत हसत काय आले नजरेला
वहाणार्‍या आंसवांना आता वाहू दे

 
स्वप्न खुषीचे कधी ना पाहिले
जरी पाहिले गेले ते स्मरणातूनी
नसेलही काही दिले गेले तुझ्याकडूनी
जे दिलेस तू ते मला उपभोगू दे

 
अंगिकारेल कुणी व्यथा कुणाच्या
जगी कुणी एव्हडे सिद्ध नसावे
वाहणार्‍या आंसवांना अजूनी वाहू दे
एव्हडे तरी वचन मजला दे

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: