मला सुपूर्द करशील का

(अनुवाद)

तू तुझ्या अंतरातले दु:ख तुझी तळमळ
मला सुपूर्द करशील का
शपथ त्या दु:खाची तुला तुझ्या ह्रदयाची
एकाकीपणाची व्यथा
मला सुपूर्द करशील का

मानिले जरी मी नसेन तुझ्या मर्जीतला
कसली हरकत देण्यात तुझे दु:ख अन वेदना
कळुदे मला तुझी होणारी जनातली छळणूक
एका अंतराला भासणारी तुझी देखरेख
मला सुपूर्द करशील का

ज्या ह्रदयात जागा हवी होती मला
ती नको त्यांनी शिरकावली
कृपा होईल मजवरी त्याची जाणीव
मला सुपूर्द करशील का
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

2 Comments

  1. G
    Posted फेब्रुवारी 16, 2019 at 12:24 pm | Permalink

    खूप भावस्पर्शी। सुंदर।


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: