धर्म आणि ज्ञान

प्रकाश ज्या ज्या वेळी मला भेटतो त्यावेळी मला काहीतरी त्याच्या मनातलं सांगून जातो.धर्म आणि शास्त्रावर माझी त्याची बरेचवेळा चर्चा झाली आहे.ह्यावेळी त्याला सुचलं ते सांगताना मला म्हणाला,

“पूर्वी मी असं म्हणायचो की,धर्म हे एक शास्त्रच आहे.धर्माला ज्ञानाशी समझोता करावा लागतो.आणि असं करीत असताना,ते सापडून घेऊन आणि त्याचा पडताळा अशा तर्‍हेने करून पहावा लागतो की जणू शास्त्र विकसीत होण्यासाठी जसा मार्ग शोधीत असतं अगदी तसंच ह्या बाबतीत असावं.आणि मलाही वाटतं जसं हे मार्ग शोधीत असताना शास्त्र जसं विकसीत होत असतं अगदी तसाच धर्म विकसीत व्हावा लागतो.

आता मी जर म्हणालो शास्त्र आणि धर्म एकसारखेच आहेत आणि लोक शास्त्राकडे मिथ्या पहात असतात की शास्त्र हा ज्ञान मिळवण्यासाठी अपरिहार्य मार्ग आहे, तर कुणी एखादा धर्माविषयी माझं मत ऐकून माझ्याशी सहमत होणार नाही.
आणि त्यासाठी धर्माला आणि शास्त्राला काही खास असे नियम पाळावे लागतात.खरं पाहिलंत तर,खास करून,धर्माची आणि शास्त्राची जी काही विकासाची कारणं आहेत,ती सर्व पूर्वीच्या पुरूष आणि स्त्रीयांनी,ज्यांच्या जवळ एकाग्र रहाण्याची पर्याप्त क्षमता होती, त्यांनी आपल्या अनुभवाद्वारे जे काही ज्ञान प्राप्त होत गेलं ते उघड करण्याचे प्रयत्न केले,त्यावर ते विश्वास ठेवीत राहिले.हे करीत असताना जर का त्यांना आणखी काही सत्यता पडताळता आली तर ते तसं उपयोगातही आणू लागले.

हे करताना त्यांच्या अंगात प्रकांड नम्रता ठेवण्याची आवश्यक्यता असायला हवी,हे त्यांना भासलं असावं. कारण जे काही सत्य त्यांनी पडताळलं, ते जवळ जवळ नित्य मूलभूत विचाराशी आणि श्रद्धेशी विरोधात असायचं.अशा स्त्री पूरूषांची नावं न घेता उदाहरणं देता येतील.ह्या व्यक्तींनी स्वतःला पूर्णपणे सत्यासमोर निर्मळ आणि पारदर्शक ठेवलं.आणि त्याचं मुख्य कारण त्यांच्या अंतरात प्रेम होतं.

खरं म्हणजे प्रेमाचं खरं स्वरूप पहाण्यासाठी त्याची एक झलक पहावी लागते.एखादी व्यक्ती प्रेमात पडते त्यावेळी,मैत्रीसाठी व्यक्तीगत त्याग करण्यासाठी लागणारा अनुभव पाहिला जातो त्यावेळी,एखाद्या मुलाच्या आनंदात सहभागी होण्यात मनात येणारी उत्कंठा त्यावेळी दिसणारी झलक, वगैरे.

माझी धारणा आहे,जरी मी क्वचितच त्या धारणे प्रमाणे जगतो म्हणा,की, मी सत्यात जगू शकतो जेव्हा माझ्या मनातली भीती मी अव्हेरतो,माझ्या प्रेमात सत्यता आणि आनंद ह्यांना स्थान देतो,.जर प्रेम हे सत्य असेल तर हे प्रेमच मला इतरांशी जखडून ठेवत असावं.

दररोजच्या जगण्याच्या धांदलीत,प्रेमापासून असफल होण्याच्या कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाणं मला अमंळ कठीण होत असतं.धर्माच्या परंपरांनी,आपल्या भावना एव्हड्या घट्ट बांधल्या गेल्या आहेत की,कधी कधी असं वाटतं की,खरोखरच आध्यात्मिक दृष्टीकोनातून सौन्दर्य,कला,नाट्य,संगीत आणि पदन्यास यांच्या माध्यमातून माणसाला प्रेमाकडे ओढलं जातं.

अशा ह्या निर्णयाला मी आलेलो आहे याचं कारण,स्त्री,पुरूष,मुलं एकमेकावर प्रेम करून प्रेमाचा खरेपणा दाखवून देतात ते पाहून,तसंच बरोबरीने शास्त्र आणि धर्म ह्याबद्दल अगाध महत्व दाखवणारे त्याचे प्रवर्तक आणि त्यांचं लिखाण वाचून ह्या स्तराला आलो आहे.”

माझ्या चेहर्‍यावरचं समाधान बघून प्रकाश खूष झाला.
श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोरनीया)

2 Comments

  1. Posted जानेवारी 19, 2019 at 7:27 सकाळी | Permalink

    नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे mhnmk.com | NMK All Maha NMK Job Recruitments advertisement details in Marathi in one place.
    MH NMK नोकरी माहिती केंद्र | Maha NMK jahirat


Post a Comment to shrikrishnasamant

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: