नका विचारू

नका विचारू मी कशी
ती रात्र गुजारली
क्षण एक जणू असा भासला
एक युगाची वेळ सरली
न पाहिला चंद्रमा पाहिले नच तारे
तहानले ज्योतीसाठी नेत्र बिचारे
पहाट येता आशा बहरली
किरणांची वाट दुरावली

नका विचारू मी कशी
ती रात्र गुजारली
एक जळे दीपक मन एक माझे
अंधार घरातला चिपकुनी राहे
त्रासूनी तडपूनी जीवन गेले

नका विचारू कशी मी ती
रात्र गुजारली
श्रीकृष्ण सामंत ( सॅन होझे कॅलिफोरनीया)

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: