वैमनस्य

(अनुवाद)

वैमनस्य असलं तरी दु:ख द्यायला ये
ये पुन्हा ये सोडून जाण्यासाठी ये

तोडीलेस जरी नाते तरी कधी ही ये
अनुष्ठान निभावण्यासाठी तरी ये
प्रीति छुपवीण्यात ही प्रीति असते
हळूच एके दिनी ते जाणण्यास तरी ये

थोडी तरी माझ्या प्रीतीची पत ठेव
तुझ्या तू कधी मला राजी करायला ये

जसे तू जाणतेस न येण्याचे बहाणे
असेच तू कधी परत न जाण्यासाठी ये

अजूनी तुझ्या प्रेमळ अंतरंगी वसे उत्साह
अखेरची ज्योत मालवण्यासाठी ये

ह्या वयात लज्जित अभागी तरूण मी
तू सुखात राहून मला रडविण्यास तरी ये

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: