तुझी शहनाई बोले

 
(अनुवाद)
तुझी शहनाई बोलते

ऐकून माझं अंतरंग डोलते

छळकुट्या

का ऐकवलीस अशी तान रे
घन भरभरून आले

कोकीळा गात रहाते

कसा संभाळू माझा जीव रे

 
वैरी होऊन दुनिया उभी ठाकली आहे

माझ्या पायात बेडी घट्ट पडली आहे

कुठल्या घटनेसाठी नजर खिळली आहे

बाराही महिने पावसाची झोड आहे

 

 

एकदाच तुझा चेहरा दाखव

मनातलं दु:ख मिटव

तुझ्याविणा सुनं सुनं माझं जीवन रे

 

 

तुझी शहनाई बोलते

ऐकून माझं अंतरंग डोलते

छळकुट्या

का ऐकवलीस अशी तान रेभासते

 

 

ये,रे,केव्हा पासून मी तुला बोलावते

तुझ्या प्रीतिच्या स्वपनाला मी सजवते

मनाला भासते ऊडून मी तुजकडे येते

 

 

प्रिया पंख कुठून मी आणावे

मी इथे अन तू तिथे

मध्येच राहिले अपुले जीवन

कशा पूर्ण होतीस अपुल्या कामना रे

 

 

घन भरभरून आले

कोकीळा गात रहाते

कसा संभाळू माझा जीव रे

 

 

तुझी शहनाई बोलते

ऐकून माझं अंतरंग डोलते

छळकुट्या

का ऐकवलीस अशी तान रे

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

One Comment

  1. mehhekk
    Posted ऑक्टोबर 9, 2019 at 1:30 सकाळी | Permalink

    Antakarna bolavate yenare, sunder.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: