(अनुवाद)
ज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये
त्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही
ज्या बगिच्या समोर तुझं घर नसेल
त्या बगिच्यामधे मी येणार नाही
जीवनात कितीही मौजमजा असुदे
चोहोबाजूला कितीही हसणं मुरडणं असुदे
सुंदर बहरलेली फुलबाग असुदे
ज्या बगिच्यात तुझ्या पायात काटा रुतला
त्या बागेतली फुलं मी खुडणार नाही
ज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये
त्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही
सर्व आणाभाका आपण विसरुन जाऊया
निघून ये तू पदर तुझा पसरून भेटाया
वा निघून जाईन मी जगताला सोडून जाया
अशा जागी जिथे येईल आठव तुझी सतवावया
त्या जागी पल भर ही कधी थांबणार नाही
ज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये
त्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )