तुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे
विश्वास ठेव मजवर तुझा विश्वास हवा आहे
सुंदरी कडून प्रेमाचा आसरा हवा आहे
अगदी भोळ्या तुला हे काय हवं आहे
तुझ्या मऊ केशपाशात तारे सजावटून
तुझ्या नाजुक पावलावर कळ्या शिंपडून
प्रेमाचे चिमुकले मंदीर बनवून
रात्रंदिवस तुझ्या पुजेत मग्न व्हायला हवं आहे
थोडा विचार कर जीव तुझा बहाल करण्यापूर्वी
काही त्यागावं लागतं लाभ होण्यापूर्वी
जमान्याकडून होकार तर घे त्यापूर्वी
की तुला सुंदरीची पुजा करायला हवी आहे
कुठवर जगूं तुझा प्रेमाचा वर्षाव झेलून
जीवन जगण्यासाठी लागतो सहारा निक्षून
पुरे झाले आता ते इशारे दूर दूर राहून
तू जवळून पहावं हेच मला हवं आहे
प्रेमाचे दुष्मन करती नेहमीच कलह
प्रेमाच्या नशिबी असे नेहमीच विरह
जे मुळीच करत नाही दोन मनाची कदर
त्यांच्याकडून मीच तुला हवी आहे
पदराचे टाेक मुखामधे पकडून
जरा ह्या इथे बघ हसतमुख होऊन
मलाच लूट माझ्या जवळ येऊन
कारण मलाच मृत्युशी खेळायला हवं आहे
सारे दावे खोटे अन सारी शपथ खोटी
कशा निभावून घेऊ प्रेमाच्या अटी
इथल्या जीवनात आहेत रिवाजांच्य तृटी
हे रिवाज तुला तोडायला हवे आहेत
रिवाजांची पर्वा नाही प्रथेची भीति आहे
तुझ्या द्रुष्टीतल्या होकारावर माझी नजर आहे
संकटमय पथावर जर धोका आहे
तुझ्या हातांचा आधार मला हवा आहे
श्रीकृष्ण सामंत
(सॅन होझे कॅलिफोर्निया )