डिसेंबर अन जान. (अनुवाद )
किती विक्षिप्त आहे ना,
डिसेंबर अन जानेवारी मधले नाते
जणू जुन्या स्मृति अन नव्या संकल्पनांचे खाते
दोन्ही तशी नाजूक भासतात
दोघांत खोल विचारही असतात
दोन्ही काळाचे प्रवासीही रहातात
दोघेही मार्गात ठोकरही खातात
खरंतर दोघांचाही भासतो
तसाच चेहरा अन तशीच धुंदी
तेव्हडेच दिन अन तेव्हडीच थंडी
पण ओळख वेगळी दोघांची
वेगळे अंदाज अन वेगळे ढंग
एकाचा होई अंत
तर एकाची सुरवात
जशी रात्री नंतर प्रभात
अन प्रभात नंतर रात
एकात स्मृति असतात
दुसरा अपेक्षांनी पुर्णत्वात
एकात पुर्तता अनुभवाची
अन दुसर्यात विश्वासाची
दोघांतील जडण आहे अशी
जणू पिळातले दोन धागे जशी
पण पहा दूर राहूनही
साथ निभवतात कशी
जो डिसेंबर सोडून जातो
त्याला जानेवारी जवळ घेतो
अन जे जानेवारीचे ठराव असतात
ते डिसेंबर निभावून नेतात
कसे जानेवारी पासून
डिसेंबरच्या प्रवासात
११ महिने जात असतात
पण डिसेंबर ते जानेवारीला
जाण्यात एकच क्षण पुरतात
जेंव्हा ते दूर जात असतात
तेंव्हा जीवनातील हर्ष बदलतात
अन जेंव्हा ते समीप येतात
तेंव्हा वर्ष बदलतात
दिसायला केवळ हे
दोन महिने दिसतात
परंतु
मोडायला अन जोडायला
नियम पाळताना दिसतात
दोघांनी मिळूनच बाकी
महिन्यंना बांधले आहे
आपल्या वियोगाला दुनियेसाठी
एक सण कसा मानायला लावले आहे
☺️. वर्ष-अखेर सुखाचे जावो ☺️
3 Comments
मस्त
खूप दिवसांनी लिहिलेत
कसे आहात काका?
अमोल नी ठीक आहे आपण कसे आहात? Thanks
मी मजेत
तुमचे तळकोकणाचे लेख, आठवणी वाचण्यास उत्सुक आहे.
वाट बघतोय, लिहीत राहा.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा