अशावेळी मज जवळी येना तू प्रिये
कुणी जेंव्हा तुझ्या अंतराला दुःख देईल
तळपत ठेऊन तुला जेंव्हा कुणी सोडून देईल
अशावेळी मज जवळी येना तू प्रिये
माझी कवाडे मोकळी असतील तुझं करिता
मोकळीच असतील तुझं करिता
कुणी जेंव्हा तुझ्या अंतराला दुःख देईल
अशावेळी मज जवळी येना तू प्रिये
या क्षणी माझी तुला जरूरी नसावी
अनेक चहाते मिळतील तुला
या क्षणी तू एक रुपवती आहेस
खुलवशील कमळ तेव्हडे ते खुलेल
दर्पण जेंव्हा तुला भिववील
तारुण्य जेंव्हा तुझी संगत सोडील
अशावेळी मज जवळी येना तू प्रिये
माझे शिर झुकलेले असेल
झुकलेलेच असणार तुझं करिता
कुणी जेंव्हा तुझ्या अंतराला दुःख देईल
तळपत ठेऊन तुला जेंव्हा कुणी सोडून देईल
अशावेळी मज जवळी येना तू प्रिये
माझी कवाडे मोकळी आहेत
कसली शर्थ नसावी प्रीती करताना
शर्थ ठेऊन केलीस तू प्रीती मजवरती
तारे जेंव्हा नजरेत चमकले जरासे
विझू लागली ज्योत दिव्याची
तुझ्याच नजरेत कमी होशील तू
अंधारात तुला शोधू पाहशील तू
अशावेळी मज जवळी येना तू प्रिये
माझी कवाडे मोकळी आहेत