निघून गेलेली वेळ न ये पुन्हा
तुच खरा रक्षक अमुचा देवा!
चारच क्षणांचे सुख अन अश्रू जीवन भराचे
एकाकीपणात निक्षून रडणे आठवांचे
दोन विरड साथ मिळाली एकमेका
तुच खरा रक्षक अमुचा देवा!
शपथ माझी मला धोका न दिला तुला
सहन करण्यावीणा नव्हता इलाज प्रीतिला
जीवनाच्या वादळाला सहारा मिळावा
तुच खरा रक्षक अमुचा देवा
रात्र होऊन माझी उष:काल आली
निष्फळ जीवनाची माझी वरात निघाली
ह्या दृश्यावीणा आहेस तू मोकळा
तुच खरा रक्षक अमुचा देवा!
श्रीकृष्ण सामंत
(सॅन होझे कॅलिफोर्निया )
One Comment
Kaka kase aahat khup varshani … Kaki kashya aahet