यक्टीच गेलीस ना?
(अंजली / कुंदा सामंत
१२ फेब्रुवारी १९३७-१ मार्च २०२२)
चाैसष्ट वर्षाच्या सोबतीचा हात
सोडून न-परतीच्या प्रवासाला
तू यक्टीच निघून गेलीस ना?
“या प्रवासाला यक्टं ,यक्टं जायचं
असतं”.असं जाताना म्हणालीस
“कोण आधी आणि कोण नंतर
हे आपण ठरवायचं नसतं.ज्याचे
भोग संपले त्याने जायचं असतं.”
अर्धा जन्म तू दुखण्यात घालवलास
माझी संगत तुझ्या सेवेत गेली
सेवा करताना मी बंधनात राहिलो
तुझ्या जाण्याने आता विसावलो
मागे रहाण्यारानां दु:खं सहन करत
आठवणींच्या जगात रहायचं असतं
या जन्मावर या जगण्यावर नेहमी
प्रेम करत दिवस जगायचे असतात
त्यांच्या आनंदात आनंदी राहून
त्यांच्या सोबतीत सोबत देवून
तुझ्या आठवणींना ऊजाळा देवून
आला दिवस हिंमतीवर घालवीन
तुझाच
आबा/पपा
(बेळगावला एकटीचा उच्चार यक्टी
असा करतात)
6 Comments
नमस्कार,
आपल्या आयुष्याच्या जोडीदाराच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतो. अंजली सामंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आपला नम्र,
श्रीरंग जोशी
Thanaks
भावपुर्ण श्रद्धांजली
Thanks
भावपूर्ण श्रद्धांजली
Thanks