(अनुवाद)
झाले अवघ्या दोन दिवसात
संपन्न आणि नाश
एव्हडीच आता ऊरली आकांक्षा
न येवो त्याची आठवण
निष्टा होती ज्यांच्यावर
त्यांनीच दिला धोका
त्या प्रीतीच्या वचानाचे
काय झाले आता
जे सांगत होते आम्हाला
अम्हीच तुमचे सदैव आहो
जम्यानंतरी तुमच्यावर प्रीती करीत आलो
तेच आता आमच्यापासून दूर गेले.
जवळ येऊनी सांगा बरे अमुच्या कानी
काय मिळाले आम्हाला असे मिटवूनी
कसूर काय केला मिळवूनी ही नाराजी
माझ्या सामोरे येऊन पहाल जेव्हा
दिसतील नजरेला ही असह्य द्रुष्ये
ज्यांच्यासाठी झाला अमुचा विनाश
श्रीकृष्ण सामंत {सॅन होझे कॅलिफोर्निया}