मजवरी नाराज व्हायचे असेल तुला

(अनुवाद)

मजवरी नाराज व्हायचे असेल तुला

होऊन जा सत्वरी

नको मात्र रुसू स्वत:वरी

माझ्यापासून दूर जायचे असेल तुला

निघून जा सत्वरी

नको मात्र होऊ स्वत: वेगळी

माझ्यावर नाराजी असो वा नसो

मजवरी भरवंसा नसेल तुला

काढून घे सत्वरी

नको मात्र बनू संशयी स्वत:वरी

नभ डोक्यावरी असो वा नसो

माती असावी पाऊलांच्या खाली

मला गैरविश्वासू म्हण वा न म्हण

तू मात्र गैरविश्वासू तुला करू नकोस

ये, जवळी सांगूदे तुला कहाणी

यदा कुणी सांगेल वा न सांगेल

तुझी तुलाच व्हावी ओळख

सहवास कुणाचा असो वा नसो

तुझ्याच आधारी जगणे आहे

शोधणे नसावे आसरा कुणाचा

मजवरी नाराज व्हायचे असेल तुला

होऊन जा सत्वरी

नको मात्र रुसू स्वत:वरी

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: