मी कॅलिफोरनीया मधे स्थाईक झालो आहे.मी माझी पत्नी कुंदा आणि दोन मुलं यांच्या सोबत रहातो.
आता निवृतीच्या जीवनात आयुष्यातले अनुभव,आणि वाचनात आलेले ईतरांचे अनुभव याचा संग्रह आठवणीत आणून तो “कृष्ण ऊवाच” म्हणून लेखात,कवितेत,विचार, चर्चा,वर्णन,टिका आणि गम्मत म्हणून,ह्या Blog मधे लिहून ईतरांशी जणू हितगूज केल्याचे समाधान मिळेल या आशाने केलेला एक प्रयत्न.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)
42 Comments
I am an ordinary citizen of usa and my original country is India.
I am retired and like to spend my time in peace
I like to write poems and some short stories and some experince of life.
tumchi block kupach sunder ahe. kavita hi chan ahet. vachun kup anand zala.
आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
let us be friends on a net.
I am also a retired person interested to read and take the knowledge about the life after death.
नमस्कार !
आपला ब्लॉग ज़रा उशीराच गवसला, अर्थात नुकसान आमचंच आहे ! थोडं फार वाचलं ते बहुतेक आवडलं , यथावकाश इथे भेटी होतीलच . अनुवादित गीतांबरोबर मूल रचनांचा उल्लेख केलात तर बरं होईलसं वाटतं.
कृपया असंच लिहित रहावे, शुभेच्छा !
नमस्कार,
आम्हालाही आपल्या अनुदिनीवर यायला जरा उशीरच झाला.
उत्तम लेखन वाचण्यासाठी इथे नियमित यावेच लागणार आहे.
पुढील लेखनासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!
नमस्कार,
आपल्या दोघांच्या comments वाचल्या.आपल्याला माझा blog वाचायला आवडला हे वाचून बरं वाटलं.
“अर्थात नुकसान आमचेच आहे! ”
आणि
“आम्हालाही आपल्या अनुदिनीवर यायला जरा उशीरच झाला.
उत्तम लेखन वाचण्यासाठी इथे नियमित यावेच लागणार आहे.”
असं आपण म्हणणं हा आपला मोठेपणा आहे आणि माझा आदर आहे,आणि त्याबद्दल आभार.
आपला अनुवादित गीताबद्दलचा विचार वाचला.आपली सुचना चांगली आहे.आणि सुचना अंमलात आणण्यापुर्वी research म्हणून आपल्याला कांही प्रश्न विचारावेसे वाटतात.
१ मूळ रचनांचा उल्लेख केल्यावर अनुवादित रचनेचा charm कमी होईल असं आपल्याला नाही का वाटत?
२ काही प्रसिद्ध रचनेची आठवण,अनुवादित रचना वाचताना कळत नकळत होत राहीली तर मजा नाही का येणार?
उदा.
“हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची”
ही माझी अनुवादित रचना आपण वाचून पहावी.हे कोणते मूळ गाणे आहे हे आपले आपल्याला समजल्यावर (हुडकून काढल्यावर) नक्कीच आनंद होईल असं मला वाटतं.
“काश्मीर की कली”ह्या चित्रपटातलं गाणं
“तारीफ करूं का उसकी,
जिसने तुम्हे बनाया”
हे उदाहरण म्हणून देतो.
“ये चांदसा मुखडा तेरा
ये जुल्फोका रंग सुनहरा
ये नीली नीली आंखें …..वगैर,वगैरे.
काही गाणी तितकी प्रसिद्ध नसतात त्यामुळे मूळ रचना देवून वाचकाचा (अनुवादित) कविता वाचतानाचा आनंद फिका पडतो असं मला वाटतं.
“यादे माझी आहेत तुझ्याजवळी
श्रावणमासी ओलेते दिवस मात्र
अन माझ्या कोऱ्या कागदावरची
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी”
हा एका प्रसिद्ध गाण्याचा अनुवाद”परतव माझ्या आठवणी” असे शिर्षक असलेली माझी कविता(अनुवाद ह्या categories मधे आहे.) वाचून आपण मूळ गाणं अवश्य (हुडकून) शोधून काढा आपल्याला आनंद होईल असं मला वाटतं.आशा भोसले हे गाणं गातात आणि संगीत रचना R.D.Burman याची आहे.एव्हडीच hint देतो.
“बुगडी माझी सांडली गं
जाता सातारला”
हे गाणं कवी माडगुळकर यानी त्याचा अनुवाद
“झुमका गीरा रे
बरेलीके बाझार मे”
ह्या गाण्यावरून केला हे मला अलिकडेच कवियत्री शांता शेळके यांच्या तोंडून “नक्षत्राचे देणे”ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळालं.आणि माझ्या मनात जरा फिकेपण आलंअर्थात अनुवाद म्हणजे word to word copy नसते हे आपल्याला माहित असावं ह्याची मला नक्कीच खात्री आहे.
आपली वाचनाची आवड आणि चिकीत्सा करण्याची उत्सुक्ता वाखाणनीय आहे असं मला वाटतं.
आपल्या दोघांचे फिरून एकदा आभार.
सामंत
सामंत साहेब , नमस्कार !
एखाद्या इंग्लिश गीताचा अनुवाद करायचा विचार कधी मनात आलाय का ? ABBA नामक group चं हे गाणं ऐकलं असेलच..
“Thank you for the music of the songs I’m singin’,
Thanks for all the joy they’re bringin’,
Who can live without it ? I ask in all honesty
What’d life be, without a song or a dance, what are we…
So I say , thank you for the music, for givin’ it to me ! ”
मराठीत हे कसं वाटेल हे बघायची उत्सुकता आहे….
हे ही करून बघावे, ही विनंती– वाचायला आम्ही आहोतच, शुभेच्छा !
samant sir,
Thanks for all the Joy!
छान आहे blog
अजून २-३ post च वाचले आहेत पण छान वाटले. नक्कीच सगळे post उत्तम असणार.
(शितावरून भात शिजला आहे का पाहतात न तसे)
जसा वेळ मिळेल तसे नक्की वाचेन.
http://to99.wordpress.com/
आपल्याला माझा ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला.
आपल्या अपेक्षेप्रमाणे माझ्या ब्लॉगवरचे इतर पोस्ट वाचून आपल्याला समाधान होईल अशी मी आशा करतो.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
chan ahe you tell me about nature wich u can not belive
and you bowe ur head for this expriance also cultchur
already i send
samantdada,
navin post vachle, arthatach mi regularly check karte, navin lihilele disle ki faar anand hoto.
tumhi gaanyancha anuvad kela aahe, tyachyasathi mazi ek ichcha purna kara, mala kahi door jab din dhal jaye hey gane faar avadate, mi tyachya anuvadala suruvuat keli tumhala kase vatate te sanga, pan gadi pude jaat nahi,
kahi door jab din dhal jaye, chandse dulhan badan churaye,
hyache mala suchlele shabd aahet
KUTHETARI DOOR KHITIJAVAR SURYA HALUCH MAVALATANA,
CHANDRAMUKHI NAVAVADHU ANGA HALUCH CHORTANA,
HALUVARPANE YETAT, MAZYA MANICHYA ANGANAT KONI SWAPANCHE DEEP UJALAVE
pudche tumchyavar sodte.
chitra.
नमस्कार चित्रा,
आनंद चित्रपटातली ती कविता मुकेश गातो, राजेश खन्ना भुमिका करतो, लिहिली आहे कवी योगेश यानी आणि संगीत दिलं आहे सलिल चौधरी यानी.मला पण हे गाणं खूप आवडतं.तुझ्या माहिती साठी सांगतो ह्या गाण्याचा अनुवाद मी माझ्या ब्लॉगवर नोव्हेंबर १७,२००७ ला केला आहे.माझ्या अनुवादीत ह्या टॅगवर गेल्यास मिळेल किंवा माझ्या पेजवर search मधे जाऊन मराठीत ’लपून छपून ” असं लिहून search केल्यावर मिळेल.
तू त्या गाण्याच्या पहिल्या कडव्याचं केलेलं अनुवादन मला खूपच आवडलं.हे मी मनापासून सांगतो.माझा अनुवाद असा होता.
लपून छपून येई दुलहन
ढळून होई दिवसाचा अस्त
होवून संध्या दुलहन मस्त
लपून छ्पून येई
छंदिष्ट माझ्या मनाच्या अंगणी
लावील का कुणी
स्वपनांच्या दीपज्योती त्याक्षणी
असेच केव्हा होती जेव्हा
बोजड निश्वास
भर भरूनी येती जेव्हा
अश्रू नयनी
मुरडत मुरडत येऊनी तेव्हा
करील का कुणी
मजवरी प्रेमाचा वर्षाव
दोन मने का कधी न जुळती
कुठून आली जन्माची नाती
वैरी होऊनी अपुले मन
असून अपुले
का दुःख साही ईतरांचे
न जाणे मन माझे भेद गहिरे
न जाणे स्वप्न माझे कसे सुनहरे
स्वप्न माझे माझेच असुदे
असून माझे
न होई केव्हाही वेगळे
चित्रा,आता गम्मत अशी आहे,की प्रत्येक आईला आपलं मुल आवडतं,प्रत्येक सुगृहिणीला आपली केलेली डिश आवडते.तसंच प्रत्येक कवीला आपली कविता आवडते.वरिल गाणं मी मुळ गाण्याच्या रचनेच्या शब्द्शः केलं नसलं तरी त्याचा आशय समजून केलं आहे.कधी कधी मुळ रचना इतकी समर्पक असते की मराठीतले शब्द मला चपखल सुचतात आणि मग मी ते गाणं शब्दशः लिहिण्याचा प्रयत्न करतो.
तू लिहिलेली रचना….
“कुठे तरी दूर क्षितीजावर सूर्य हळूच मावळताना
चंद्रमुखी नववधू अंग हळूच चोरताना
हळूवारपणे येतात
माझ्या मनीच्या अंगणात
कोणी स्वपनाचे दीप उजळावे”
फार सुंदर रचना केली आहेस.मला वाटत्तं त्यापुढची कडवी पण तूच करावीस.कारण तुला कविता करायची प्रतिभा आहे हे नक्कीच.वेळ का लागेना,अनुवाद पूर्ण करून मला जरूर पाठवून द्यावास.एकाच मुळ गाण्याच्या दोन निरनीराळ्या रचना बघून मजा येईल.दोन आयांची दोन वेगळी वेगळी मुलं.दोन निरनीराळ्या डिशीस.
“होवून संध्या दुलहन मस्त
लपून छ्पून येई”
(साँझ की दुल्हन बदन चुराए
चुपके से आए)
संध्या लपून छपून येई असा मी गाण्याच्या ओळीचा अर्थ घेतला.
“हळूवारपणे येतात
माझ्या मनीच्या अंगणात”
त्याच मुळ ओळीचा तू असा अर्थ घेतलास.दोन्ही अर्थ आपल्या आपल्या जागी अचूक आहेत.
हवं तर मी मुळ गाणं तुला मी खाली देत आहे.
kahii.n duur jab din Dhal jaaye
Movie: Anand
Singer(s): Mukesh
Music Director: Salil Choudhary
Lyricist: Yogesh
Actors/Actresses: Amitabh Bachchan, Rajesh Khanna
Year/Decade: 1970, 1970s
Back to: main index
View: Plain Text, हिंदी Unicode, image
कहीं दूर जब दिन ढल जाए
साँझ की दुल्हन बदन चुराए
चुपके से आए
मेरे ख़यालों के आँगन में
कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए
कहीं दूर …
कभी यूँहीं, जब हुईं, बोझल साँसें
भर आई बैठे बैठे, जब यूँ ही आँखें
तभी मचल के, प्यार से चल के
छुए कोई मुझे पर नज़र न आए, नज़र न आए
कहीं दूर …
कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते
घनी थी उलझन, बैरी अपना मन
अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये
कहीं दूर …
दिल जाने, मेरे सारे, भेद ये गहरे
खो गए कैसे मेरे, सपने सुनहरे
ये मेरे सपने, यही तो हैं अपने
मुझसे जुदा न होंगे इनके ये साये, इनके ये साये
कहीं दूर …
मंगेश पाडगांवक म्हणतात,
“जेव्हा तुमचं आणि आमचं मन जूळतं
तेव्हा तुम्हाला आमचं गाणं पटतं”
आणि हे खरंच आहे.तरीपण मी माझ्या एका कवितेत लिहिलं आहे.
“प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मनातल्या तुझ्या कवितेची
जरा मी जास्त पाल्हाळ केला असं तुला वाटेल कदाचीत.पण तुझी कविता लिहिण्याची स्फुर्ती मला आवडली एव्हडंच.माझे लेख आणि लेखनं तू नेहमी वाचतेस हे वाचून मला बरं वाटलं.वाचक हा माझा मायबाप आहे असं मी नेहमी समजतो.
ते गाणं तू जरूर पूर्ण करावं ही इच्छा.
samantdada,
itkya patkan utter dilat tyabaddal atyant abhari aahe,
mala tumhi protsahan dile aahe tar aata mi jarur prayatna karin.
aani tumhala nakkich pathvin. Tumhi dilelya upama faar avadalya.
Lobh aahe to vaadhava,
chitra.
Hi Sir,
I like to read ur posts..They are really comee from real life experiences and having deep something it..I like to ask havent u thought of setteled in our motherland??
How do u feel living away from India??
नमस्कार अतुल,
आपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार.आपल्यासारखे वाचक डोळ्यासमोर ठेऊन मी लिहित असतो.वाचकाना आवडावं असं लेखन करण्यात निराळीच मजा येते.
माझे सर्वच नातेवाईक इकडे असल्याने अर्थात त्यांच्या बरोबर रहाण्यात मला सुख वाटतं.
भारता पासून दूर राहिल्याने अर्थातच मला वाईट वाटतं.पण कुठेतरी व्यवहार आणि भावना यांचा समतोल ठेवावा लागतो.
सध्या जग एव्हडं लहान झालं आहे की इंटरनेट,वेबकॅम,टीव्ही,आणि फोन या साधनांची इतकी सोय झाली आहे की तसा कुणापासून दूरावा भासत नाही.
HI samant kaka tumche lekh changle ahet. kharach vachlyavar khup bar vatat specially aai ya vishyavarache tumche lekh mala khup avdle he lekh jo vachel to kharach aaila kadhi visaru shakt nahi visaran lambach ahe tyala aai vishyi khup khup prem vatel. kharach aaivishayi jevdh bolu tevdh kamich ahe
thanks……………………………..
नमस्कार दिनेश,
आपल्याला माझे लेख चांगले वाटतात हे वाचून बरं वाटलं.आईबद्दल आपण जे लिहिलं आहे ते अगदी सत्य आहे.माझे आईवरचे लेख आपल्याला आवडले कारण तुमचं पण आईवर खूप प्रेम असणार.
आपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार.
चांगला ब्लॉग आहे तुमचा.
आवडला.
आपल्याला माझा ब्लॉग वाचायला आवडतो हे वाचून मनस्वी आनंद झाला.आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल आभार.
Dear sir,
My native palce vengulre-matond, you are given information about vengure. I like your blog, keep it up.
Raj Ghogale-9029424609 mumbai
जरूर.
आपल्या प्रतिकियेबद्दल आभार.
sakal zali Bhairu uthala…..I want full story. please see.
वसंतजी,
जरा विस्ताराने कळवा मला आपलं म्हणण्ं कळलं नाही.
Sakal Zali Bhairu Uthala, Nangar Ghetla , Shetat Gela, Shet Nangarale. Dupar Zali , Auut Sodale etc….. This was a text book lesson in 1st or 2nd std. I want the full lesson, if you so remember(around 6 to 8 lines). V.V.kelkar, Dombivali vvvkelkar@gmail.com
नमस्कार केळकरसाहेब,
आपल्याला हवी ती गोष्ट मला खरोखरच आठवत नाही.आपल्याला मी एक सुचना करीन.आपण google करून पहावं.कदाचीत आपल्याला सापडेल.good luck.
I have read the following Diwali Ank uptill now. 1) Anternad 2) Shri Diplalaxmi 3) Mauj. All are fine. I am a fan of Ravindra Pinge (Tikhale – ward – which often comes in your writing also. Love you. Vasant Kelkar.28/11/10
आभार
kaka chhan aahet blogs aani kavita …..ashyach chhan chhan kavita karat raha
नमस्कार कमलेश
तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार
aapla blog pratham visit kalaya khoob chhan thoughts aahe
नमस्कार मौशमी,
आपल्याला माझा ब्लॉग आवडला हे वाचून बरं वाटलं.जरूर वाचा.आपल्याला गोष्टी नक्कीच आवडतील.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
चांगला ब्लॉग आहे तुमचा.आवडला
जवाहरलाल,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
विदेशात राहुन देखिल तुमी मराठीचा मान ठेवला. धनेवाद
गणेश
महाrashtra
गणेश,
आपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
मला सुद्धां आपल्या सारखाच छंद आहे.
छान उपक्रम!
तळेकर
तळेकर,
आपल्याला माझ्या शुभेच्छा.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
kharach khup chaan lekhan ahe tumch……kaka
I read and like your blog please provide your email address for important official communication on
akshaydandekar@bookstruck.in