Author Archives: shrikrishnasamant

मी कॅलिफोरनीया मधे स्थाईक झालो आहे.मी माझी पत्नी कुंदा आणि दोन मुलं यांच्या सोबत रहातो.
आता निवृतीच्या जीवनात आयुष्यातले अनुभव,आणि वाचनात आलेले इतरांचे अनुभव याचा संग्रह आठवणीत आणून तो “कृष्ण ऊवाच” म्हणून लेखात,कवितेत,विचार, चर्चा,वर्णन,टिका आणि गम्म्त म्हणून,ह्या Blog मधे लिहून इतरांशी जणू हितगूज केल्याचे समाधान मिळेल या आशाने केलेला एक प्रयत्न.

दोष कसा अंतराचा

(अनुवाद) देऊ कसा दोष अंतराला जेव्हा कोण कुणाशी प्रीती करते न जाणे केव्हा कोण कुणाशी प्रीती करते उंच उंच महाला मधली छान छोकी न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती पर्वताला मेघ जसे चिपकतात जशा सागरात लाटा उसळतात तशा चेहर्‍याअवर नजरा स्तब्ध होतात हो,नजरा होत नाहीत स्तब्ध दुनियेतल्या सर्व प्रसन्नतेवर, देऊ कसा दोष अंतराला जेव्हा न माझ्या […]

नका विचारू

नका विचारू मी कशी ती रात्र गुजारली क्षण एक जणू असा भासला एक युगाची वेळ सरली न पाहिला चंद्रमा पाहिले नच तारे तहानले ज्योतीसाठी नेत्र बिचारे पहाट येता आशा बहरली किरणांची वाट दुरावली नका विचारू मी कशी ती रात्र गुजारली एक जळे दीपक मन एक माझे अंधार घरातला चिपकुनी राहे त्रासूनी तडपूनी जीवन गेले नका […]

धर्म आणि ज्ञान

प्रकाश ज्या ज्या वेळी मला भेटतो त्यावेळी मला काहीतरी त्याच्या मनातलं सांगून जातो.धर्म आणि शास्त्रावर माझी त्याची बरेचवेळा चर्चा झाली आहे.ह्यावेळी त्याला सुचलं ते सांगताना मला म्हणाला, “पूर्वी मी असं म्हणायचो की,धर्म हे एक शास्त्रच आहे.धर्माला ज्ञानाशी समझोता करावा लागतो.आणि असं करीत असताना,ते सापडून घेऊन आणि त्याचा पडताळा अशा तर्‍हेने करून पहावा लागतो की जणू […]

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

१ जानेवारी २००७ पासून मी माझा “कृष्ण उवाच” हा ब्लॉग लिहायला घेतला. ह्या वर्ष अखेर बारा वर्ष होतील ह्या लिखाणाला. गेली बारा वर्ष मी ह्या ब्लॉगवर सातत्याने लिहीत आलो आहे. हा एक-हजारावा पोस्ट मी माझ्या मुलीला समर्पण करीत आहे. (माझे मित्र श्री.डोंगरे ह्यानी अलीकडेच मला एक लेख पाठवला होता.त्याचं शिर्षक होतं “*’परदेशस्थ’ मुलीचं पत्र* थोडक्यात […]

मला सुपूर्द करशील का

(अनुवाद) तू तुझ्या अंतरातले दु:ख तुझी तळमळ मला सुपूर्द करशील का शपथ त्या दु:खाची तुला तुझ्या ह्रदयाची एकाकीपणाची व्यथा मला सुपूर्द करशील का मानिले जरी मी नसेन तुझ्या मर्जीतला कसली हरकत देण्यात तुझे दु:ख अन वेदना कळुदे मला तुझी होणारी जनातली छळणूक एका अंतराला भासणारी तुझी देखरेख मला सुपूर्द करशील का ज्या ह्रदयात जागा हवी […]

असू वा नसू

(अनुवाद) आम्ही असू वा नसू सुगंधाने दरवळत राहू फुलांच्या कळ्या बनून पहाटेचा वारा बनून ऋुतू कुठला का असेना रंग-रुप होऊनी ह्या बगिच्यामधे हवा हवा असा सुगंध घेऊन ऊडवून देऊ केशपाशातून शिशिरात अथवा वसंतात डुलत डुलत फुलत फुलत बहरत्या कळ्यांच्या स्वरूपात कळ्या बनून फुलत फुलत राहू हरवलो असे जणू आम्ही भेटलो वा दूरावलो होणार नाही ह्रुदय […]

नसे तुलाच ठाऊक

(अनुवाद) नसे तुलाच ठाऊक कुठल्या जगात तू भ्रमंती करीत आहे मी तर ह्या भरल्या जगात एकटा एकांतात झुरत आहे नसे तुलाच ठाऊक कुठल्या जगात तू भ्रमंती करीत आहे एकच जन्म अन लाखों व्यथा दम गायब अन घुसमट सर्वथा डुबलेल्या तुझ्या आसवांनी ये निरखूदे तुझ्या नेत्रांना लुटून माझे सर्व जीवन बसलीस कुठे तू छपून मरण येत […]

विस्मरलेल्या कहाण्यांनो

(अनुवाद) विस्मरलेल्या कहाण्यांनो याल का पुन:श्च तुम्ही माझ्या स्मरणात आता नजरे समोर घन दिसू लागले पुन:श्च कुठून आल्या त्या विस्मरलेल्या काही परछाया ती गाईलेली अवीट गीतें ती दूरावलेली गंभीर स्मरणें ती काही अर्थहीन गीतें झाली अर्थहीन तरी होती अपुली लज्जित झाल्या नजरा आठवूनी विस्मरलेल्या कहाण्यंनो याल का पुन:श्च तुम्ही माझ्या स्मरणात खुप विलासी तो काळ […]

काय सांगू न कळे

जगदीशसिंग आणि चित्रासिंग यांच्या एका गझलीचा (अनुवाद) चि: तू अन तू आहेस माझ्या अंतरात अंतरी उपचार कोणता करूं जग: अंतरंग तू अन अंत:प्राण ही तू बलिदान करण्याविना काय करूं दो: तू अन तू आहेस माझ्या अंतरात अंतरी उपचार कोणता करूं चि: गमवूनी मजला मिळवूनी तुला काय काय लाभले काय सांगू तुला होऊनी तुझी जीवनी माझ्या […]

तू प्रेम कर अथवा द्वेष कर

  (अनुवाद) तू प्रेम कर अथवा द्वेष कर नेहमीच आम्ही तुझे प्रेमवेड्यापैकी हवं तर नको आम्हा जवळ करूस पण नको समजूस अनोळख्यापैकी   मरणाला अमुचा नसे नकार जगत आहो फक्त इच्छा समजून तुझ्या लिहीलेल्या उपन्यासात नाव अमुचे येईल कदापी चुकून तू प्रेम कर अथवा द्वेष कर नेहमीच आम्ही तुझे प्रेमवेड्यापैकी   भेटू आपण जरा जपून […]