Category Archives: अनुवादीत

झाले अवघ्या दोन दिवसात

(अनुवाद) झाले अवघ्या दोन दिवसात संपन्न आणि नाश एव्हडीच आता ऊरली आकांक्षा न येवो त्याची आठवण निष्टा होती ज्यांच्यावर त्यांनीच दिला धोका त्या प्रीतीच्या वचानाचे काय झाले आता जे सांगत होते आम्हाला अम्हीच तुमचे सदैव आहो जम्यानंतरी तुमच्यावर प्रीती करीत आलो तेच आता आमच्यापासून दूर गेले. जवळ येऊनी सांगा बरे अमुच्या कानी काय मिळाले आम्हाला […]

मजवरी नाराज व्हायचे असेल तुला

(अनुवाद) मजवरी नाराज व्हायचे असेल तुला होऊन जा सत्वरी नको मात्र रुसू स्वत:वरी माझ्यापासून दूर जायचे असेल तुला निघून जा सत्वरी नको मात्र होऊ स्वत: वेगळी माझ्यावर नाराजी असो वा नसो मजवरी भरवंसा नसेल तुला काढून घे सत्वरी नको मात्र बनू संशयी स्वत:वरी नभ डोक्यावरी असो वा नसो माती असावी पाऊलांच्या खाली मला गैरविश्वासू म्हण […]

अंतरी माझ्या आनंद गवसेना

(अनुवाद) अंतरी माझ्या आनंद गवसेना हसावे असे वाटतां रडावे लागले नीशी दिनीच्या यातना आजही होत्या लपवाव्या असे वाटतां रडावे लागले सांगावे तरी किती काय झाले असावे तुला काही नकळे अन मी अज्ञानी असावे एव्हडे समजले तरी बरेच समजले म्हणावे हसण्याचा बहाणा आणूनी चेहर्‍यावरी सत्य लपवावे असे वाटतां रडावे लागले असे किती असतील तारे नभामधे एक […]

आणू कुठून ती खुशी सांग एकदा

अनुवाद अंगीकारीलेस जे तुझे तुला आणू कुठून मी ते सदा सर्वदा भावते जी तुझ्या अंतराला आणू कुठून ती खुशी सांग एकदा तेच फुल मी ज्या सर्वांनी तुडवीले तेच जीवन जे आंसवानी वाहिले श्रावण वर्षा होऊन बरसणारा आणू कुठून तो मेघ सांग एकदा भावते जी तुझ्या अंतराला आणू कुठून ती खुशी सांग एकदा लालसा असे तुला […]

कुणीतरी सांगेल का मला

अनुवाद. अंतरातल्या नजरेतून, नजरेतल्या अंतरातून हे गुपित काय असावे,हे रहस्य काय असावे कुणीतरी सांगेल का मला हळूच उठून ओठावर आले ते गीत काय असावे,ते रहस्य काय असावे कुणीतरी सांगेल का मला का अजाणतेने मी मोहित झाले कोणत्या बंधनाने मी बंदिस्त झाले काही हरवत आहे,काही गवसत आहे ते गुपित काय असावे,ते रहस्य काय असावे कुणीतरी सांगेल […]

जा विसरूनी ते आठव या क्षणी

अनुवाद आठव माझे आहेत तुज जवळी परतवून दे मला माझ्या आठवणी आठव माझी कोर्‍या कागदावरची लिपटलेली त्यात ती काळोखी रात्र श्रावणातले ओले दिवस आठव मात्र जा विसरूनी ते आठव या क्षणी अन परतवून दे माझ्या आठवणी ग्रिष्मातली पानांची ती पडझड पडत्या पानांची ती सळसळ वहात्या झर्‍याची ती खळखळ कानी माझ्या अजूनी घुमती आठव माझे आहेत […]

हिच खरी समस्या असे जीवनाची

अनुवाद सांजवेळी आली आठव सजणाची हिच खरी समस्या असे जीवनाची ओठावरती ढंग आणिला हास्याचा विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा अचानक हे काय झाले चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा केला अहंभाव दूर तो असताना करूनी यत्न त्या विषादाला ठेवीले दूर मी हृदयातून परी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला सांजवेळी आली आठव सजणाची हिच खरी समस्या असे जीवनाची […]

तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून

अनुवाद जीवनी माझ्या तू कशी अशी झालीस सामिल जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी जीवन भासे यात्रा अन देवी तू  मंदिरातील जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल हर एक फुल महकते आठव […]

गीत माझे ऐकशील जेव्हा

(अनुवाद.) असा कसा विसरशिल तू मला गीत माझे ऐकशील जेव्हा संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा चांदण्या रात्री बहरलेल्या बागेत गुजगोष्टी प्रीतिच्या केल्या अनेक त्या घटनांची जेव्हा येईल आठव प्रीति सुमनांना तुझ्या अंतरी साठव हातात हात घेऊन चालत होतो निशीगंधाचे फुल दिले मी तुला अशी कशी विसरशिल ती संध्याछाया गीत माझे ऐकशील जेव्हा संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा […]

खरी होवोत स्वपनांची साठवण

अनुवाद. ही चिंब-चिंब झालेली अंधारी रात्र ही मस्त मस्त फुललेली रमणीयता असे असुनही का चांदणीची उदासिनता हळूवार उगवता हा चंद्रमा प्यारा झोप येईना पाहूनी ह्या ऋतुचा इशारा ठुमकत ठुमकत येई हवेची लहर अशाच वेळी का होई उद्विग्न अंतर कळ्या फुलांवर येई अचेतन आद्रता कुणी जाणावी जीवनातील कमतरता उजळ दिवशी जे न मिळे स्वप्न ते शोधीत […]