Category Archives: आई विषयी

आईची विटंबना.(रामपुरी ते रायफल)

माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली,पण ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला. पण तिने कधीही हातात काठी घेऊन कुणाला मारायला आपल्या घराबाहेर पडली नाही.इतकी […]

आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…!

आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच,  “अगं मी येते!, अरे मी येते! ” असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती “आई” तिच माऊली, तिच मॉं, तिच माय,  म्हणजेच “my”- माय- माझी,  MOM […]

उन्नत्ती

प्रत्येक आईला आपल्या मुलाची उन्नत्ती पाहून असंच वाटत असणार. ते कसं आणि त्या मुलाला आईला काय सांगायचं आहे ते खालील कवितेत लिहीले आहे. उन्नत्ती माझी उन्नत्ती पाहून आई, न्याहळले मी तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाला अन सप्तरंगाचे धनूष्य दिसले मला रंग होता त्रुप्तीचा जांभळा कुतुहलाचा निळसर कौतुकाचा निळा कर्तव्य पुर्तीचा हिरवा देवाच्या कृतज्ञतेचा पिवळा शाबास्कीचा संत्र्या सम […]

सातवा महिना

 सातव्या महिन्यावर आईची ओटी भरतात (ज्याला बेबी शॉवर म्हणतात) त्यावेळी त्या उदरातल्या बाळाला आईचा आनंद पाहून काय संदेश द्यायचा आहे ते ह्या कवितेत सांगितले आहे तुझ्या उदरातून  पाहिला मी आई,तुझा आनंदाचा सोहळा जरी पुर्ण काळोख होता इकडे सगळा येइन मी प्रकाशात जेव्हां पुनश्च पाहीन मी तुझा आणि माझा अत्यानंद आगळा          श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे […]

आईविना भिकारी

आईची स्तुस्ती कितीही केली तरी ती कमीच म्हणावी लागेल.आईचा आणि मुलांचा शरिराशी असलेला दुवा ही मुलाच्या पोटावर असलेली “बेंबी” साक्ष आहे.जन्म झाल्यावर हा दुवा जरी कापला जातो तरी “रावा पासून रंका पर्यन्त ” सुख दु:खात आईला विसरुं शकत नाही.त्यातच ह्या “महान आईचे”अस्तित्व”अजरामर झाले आहे. अनेकानी आईची स्तुती अनेक काव्यातून आणि लेखनातून प्रदर्शीत केले आहे. त्यात […]

माझी सुंदर आई

एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले “सामंत,खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं. देवाचे अस्तीत्व आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवते माझी आई सांगायची की “देव खूपच सुंदर दिसतो”खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?” त्या निरपराध बाळाला आई […]

आईचे रुदन

प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले “सामंत. आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया.” मी म्हटलं”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात” तसं काही नाही सामंत,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय.ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दु:खात अश्रु ढाळण्याचे काम दिलं आहे.शासत्रद्न्य म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस आपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न […]

आईची आठवण

प्रथमच आई मुलांना सोडून ऑफिसच्या कामाला म्हणून स्यानफ्र्यान्सिसकोला दोन दिवसासाठी जाते.मुलांना खूप आठवण येते.त्याना काय म्हणावयाचे आहे ते खालील कवितेत सांगितले आहे. आईची आठवण तूं ईथे असताना देशी कधी ऒरेंज चिकन कधी देशी चीली चिकन तूं ईथे नसताना सूने, सूने भासे तिन्ही सांजे ईकडचे कीचन २). करी, डाळ,भात,भाजी अन कांद्याची भजी देई आम्हा अमूची प्रेमळ […]