Category Archives: कविता

जणू अंतरंग भंगून गेले

  (अनुवाद) होता तो बहाणा सख्या तुझ्या प्रीतिच्या दु:खाचा माझे प्राक्तन असे होते जणू अंतरंग भंगून गेले दु:ख नसते तर अन्य असते भाग्यात माझ्या रुदन असते अशा समयी काय समजावे तू कुणी जाचक तर नाही ना तुझ्या अंगी ह्रदय वसावे तुझ्या अंगी पाषाण तर नाही ना तू ऊध्वस्त केलेस मला असेच मी समजून गेले माझे […]

अन्याय

(अनुवाद) हे मना! कर सहन निष्ठुर अन्याय जमान्याशी झुंजत रहा अआणि जगत रहा असेच हसत रहा अन अश्रु ढाळीत रहा हे मना! कर सहन निष्ठुर अन्याय हे मना! हिच आहे प्रथा प्रीतिची तुला भोगाव्या लागतील व्यथा अन तू मात्र त्यांना दुवा देत रहा हे मना! कर सहन निष्ठुर अन्याय तो नजरेचा एकच कटाक्ष ठेवलास समिप […]

काळाने किती थट्टेने केला अन्याय

(अनुवाद) काळाने किती थट्टेने केला अन्याय तू तुझी न राहिलीस अन मी माझा विकल मनाने भेटलो जणू असे विरह कदापी जणू जाणीला नसे तुही तुला विसरलीस अन मी मला एकाच वाटेवर अवघी दोन पाऊले काळाने किती थट्टेने केला अन्याय तू तुझी न राहिलीस अन मी माझा   जायचे कुठे ठाऊक नाही निघालो परंतु मार्ग नाही […]

रे मना धीर धर ना जरा

(अनुवाद) रे मना धीर धर ना जरा कुणाचा मोह करावा हे ह्या निर्दय मोहाला माहित नसे हया जीवनाची चढती ढळती प्रभा कुणी बरे धरून ठेवीली रंगावरती कुणी बरे रोख आणिली रुपावरती कुणी बरे बंधने आणिली कुणी बरे केली ही नसती अटकळ उपकार मान तयाचे सत्वरी ज्याने निभावली साथ तुझ्याशी स्वप्न असते जनन-मरणाची मेळ विसरूनी जा […]

कसे विसरीन मी तुला सहजपणे असा

(अनुवाद) तुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी असे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले रहा तू हवे तिकडे तू एकच माझा सखा कसे विसरीन मी तुला सहजपणे असा पदो पदी केली पुजा माझ्या सख्याने अन रडविले मला बहरलेल्या फुलांनी तुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी असे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले माझ्या नजरेत मला […]

संशयी मना कसे सांगू मी तिला

(अनुवाद) मन भरून कसे पाहू मी तुला संशयी मना कसे सांगू मी तिला तू माझी कसे तुला मी म्हणू सार्‍य़ा जगाला कसे मी पटवू मन भरून कसे मी तुला पाहू उताविळ तू अन बेचैन मी तुला भेटण्या उत्कंठा वाढली संयमाची सीमा आता संपली दाह प्रीतिचा अंग जाळू लागली आज भेटीची घडी का चुकली भासे ह्रदयाची […]

कवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे

(अनुवाद) ह्या जीवनाला होता अजून तुझा आसरा भटकत जाण्य़ाविना आता नसे मार्ग दुसरा क्षणात नष्ट होतात जीवनभरचे रस्ते जेव्हा अंतरात त्यांचे वास्तव्य नसते दोषी अन निर्दोषी एकमेका सामिल झाले हे त्वरीत जाणिले अमुच्या दुर्भाग्याने नसता अपुली जरूरी कुणी काय करावे कवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे   श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

हे मना

(अनुवाद) रमत गमत हसत हसत गुणगुणत चल हे मना हे मना तू होऊनी मग्न चल सजवित घेऊनी स्वप्न रमत गमत हसत हसत गुणगुणत चल हे मना   फुलांनी भरलेल्या ह्या डहाळ्या सुगंधी सुगंधी ह्या पाकळ्या कळ्या दिसती नाजुक कोवळ्या नजरेत भरूनी हसत हसत चल हे मना तू होऊनी मग्न चल सजवित घेऊनी स्वप्न   अवसर […]

माझे प्रेम मला परत दे

(अनुवाद) ती माझी निद्रा ती माझी मौज मला परत दे ती माझी प्रीत ती माझी व्यथा मला परत दे माझी निद्रा मी जेव्हडी घालवून बसलो माझी मौज मी जेव्हडी हरवून बसलो ती माझी निद्रा ती  माझी मौज मला परत दे ती माझी प्रीत ती माझी व्यथा मला परत दे   एक भोळे ह्रदय आहे अन […]

चांदणी जीवंत असावी यास्तव

(अनुवाद) चंद्र एव्हडा ऊजळला आहे चांदणी जीवंत असावी यास्तव मी अजुनी पुरता जीवंत आहे जीवन जीवित असावे यास्तव अंतरात अगणीत दु:ख भरलेले आंसवे अगणीत नेत्रात भरलेली वेदना अगणीत अंगात भरलेली जळती वात अन शरीराची दाहीदाही दोन्ही मिळूनी जीवित ठेवू दे प्रीतिलाही मी अजुनी गाणे गुणगुणत आहे रागिणी जीवंत असावी यास्तव श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)