Category Archives: कवितेतून विचार

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

“बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!”  आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते?  त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील सुंदर कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली, आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. वा.. बेटा […]

मातृदिन

“अगं, आई! कमलमूखी तू सुंदर असता रूप विधात्याचे कसे वेगळे?” ह्याचं उत्तर जाणण्यासाठी, आईला “आई”च का म्हणतात हे जाणण्यासाठी, ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी, ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या अभाग्यांसाठी, “बाळा! तुला लागलं कारे?” हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी आईची व्यथा जाणण्यासाठी, आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी, चिमुकली तनुली आईला काय […]

ऋण काढून सण

प्रोफेसर देसाई आज जरा खुषीत दिसले.मला म्हणाले,  “सामंत, तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी  तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चं “पन” जास्त आहे बघा. तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक […]

दिवस जूने भुलायचे

आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला सुंदर दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला.नवीन कायदा पास करून हेल्थ स्कीममधे सिनियर सिटीझनना ही सवलत दिली गेली. भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले, “आमचे जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.आता काळजी वाचून जगायला हरकत नाही.” उद्दा […]

तो होता देवाचा स्विमिंगपूल

हेमंत माहात्मे काल बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला. हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता. “डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरिरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची […]

“अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर”

“अमेरिकेत प्रथमच येणार्‍यांनी आपले जुने संस्कार न विसरता रहावं.तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपल्यात सुधारणा करून घ्यावी.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच आपण पंचाईत करून घेत असतो. नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही.अहो गाईचं मांस,डुकराचं मांस मिळालं म्हणून आपण खायचं काय?ते न खाता इकडे जगतां येत नाही काय?दुसरं इकडे ऋण काढून सण करण्याची प्रथा […]

उद्वेग विसरून कसं चालेल?

उद्वेग विसरून कसं चालेल? आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि […]

नको म्हणू रे मनुजा!

हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि […]

मला कविता होते

मला एक जुनं गाणं आठवतं. “आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे करूं काम,स्मरूं नाम मुखी नाम हरी रे” त्याच कल्पनेने “आम्ही काव्याचे काव्याचे काव्यकरी रे लिहूं काव्य,स्मरूं शब्द मनी प्रेम प्रेम रे” हे असं सांगताना कवी काय किंवा शेतकरी काय दोन्ही बिचारे स्वतःला कामात व्यग्र ठेऊन समाजाची सेवाच करत असतात म्हणाना.अर्थात एक पोट पुजेची सोय करतो […]

तनुलिचं गद्य,पद्य

तनुलीचे गद्य,पद्य तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबाबरोबर त्यांना पोहचवायला गेली होती.त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली का असे गेलात तुम्ही ना बोलता ना सांगता सहवासाच्या संगतीची हिच का हो वाच्यता? नंतर घरी अल्यावर आईबाबांचे बोलणे तिने ऐकले. आईबाबा आले […]