Category Archives: गम्मत

अमेरिकेतला भारतीय बाप.

“कारण तिला पण नवऱ्याने असली कामं करावीत म्हणजे अप्रशस्त वाटायचं आणि मोठी माणसं पण आपली टिंगल करायची.त्यामुळे आपण त्यावेळी ह्या सर्व गोष्टी पासून परावृतच असायचो.” आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा. पण आज काही विशेष त्याना सांगायचं होतं […]

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

“जेणूं काम तेणूंच थाय बीजा करे तो गोता खाय” (मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.) मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो. त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा.म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं. माझ्यात आणि माझ्या थोरल्या भावात दहा वर्षांचा फरक होता.”फरक […]

वेंगुर्ल्याचो भावडो.

“काय झालां तेतेबाय?” “अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झाला.” “भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या? मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते.” “कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला.बायजाचा आत्ताच लगिन झाला मां?.मी आपलो त्येंका […]

असंच एक स्वप्न.

मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती.सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.काही डबक्यात अगदी लहान मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत […]

थोडक्यात, न विचारलेला विचार.

“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे” यालाच,  “जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात. जीवनात,  “कधी खुषी कधी गम” असतं, बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या  आहेत असं वाटतं. वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार. “नाचरे मोरा आंब्याच्या वनांत ”  असं म्हणता,म्हणता “कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते”  असं म्हणे […]

“होय म्हाराज्या !”

होय म्हाराज्या! कोकणात देवाला गाऱ्हाणे घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजाऱ्याकडून (भटजीकडून) गाऱ्हाणे घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारची मानसीक तृप्ती प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते. पुजाऱ्याच्या प्रत्येक statement पुढे “होय म्हाराज्या” असे म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली असते. ह्या […]

भावंडांची गुप्त भाषा

भावंडांची गुप्त भाषा अण्णा,आबा,दादा,आते आणि आप्पा ह्या चार भावंडांची एक गुप्त भाषा होती. लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक “चकारी” भाषा आहे आणि बहुतेक सर्वांना ती माहित असावी.उदा.”तुला माहीत आहे का?”  हे वरील “चकारी”भाषेत म्हटलं जाणार “चलातू चहीतमा चहेत का?” अशाच प्रकारची थोडी वेगळी भाषा होती.आणि हे सर्व त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल, […]

“तूमको भेजा नही”या वरून वाद

“तुमको भेजा नही” वरून वाद असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही. सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन एक बघ्याची भर […]

सिन्थॉलला निरमाकडून उत्तर

साबणाच्या पत्राला उत्तर (सचीन ठाकरे यानी लिहीलेल्या पत्रास उत्तर) प्रिय सिन्थॉल दादास, निरमाताईचा, सप्रेम नमस्कार वि.वि. तुझे पत्र मिळाले वाचून आनंद झाला. भारतात परत आल्यावर त्याचे नाव बदलल्याचे पाहून “लाईफ बॉयला” वाईट वाटणे सहाजीक आहे.परंतु त्याने “फेअरग्लोला ” मधे घेण्याचे कारण नव्हते.डॉ.डेटॉलचे आभार मानणे आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला. यावरून एक सिद्ध होते की उगीच […]

न विचारलेला ऊपदेश

“सुख जवा पाडे दु:ख पर्वता एव्हडे” ह्यालाच “जिवन ऐसे नांव” असे म्हणतात.जिवनात “कधी खूशी कधी गम”असते.बालपण,तरूणपण आणि म्हातारपण ह्या शेवट पर्यंत जगल्यावर अनुभवायच्या stages आहेत.वसंत,ग्रीष्म हे ऋतु सर्व stages मधे येणारच.”नाचरे मोरा अंब्याच्या वनात” असे म्हणता म्हणता “कां नाही हंसला नुसते,मी नाही म्ह्टले नसते” असे म्हणे पर्यंत “जन पळ भर म्हणतील हाय हाय” म्हणण्याची वेळ […]