Category Archives: गोष्ट

पहिल्या नजरेतलं प्रेम.

“ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टा्कावं, आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची क्षमता असणं,त्या क्षमतेला काय म्हणावं.?” सुशा,उषा आणि निशा अशा ह्या तीन बहिणी.प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा आणि विचार निरनीराळे.सुशा योग्य वयात लग्न करून संसाराला लागली. आपल्या संसारात ती सूखी […]

त्या पायलटचं नांव काय?

“आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो.” अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता. आमचे […]

“तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली.”

आज मी गुरूनाथला विचारलं, “तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?”  त्याच्या त्या सफेद टोपीची “ष्टोरी”  माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला. “अरे तू एव्हडा हंसतोस का?” असं मी त्याला म्हणालो. “ती टोपी आणि मी हंसतो कां? ह्या दोन्ही गोष्टी मी तुला सांगणार आहे.” असं म्हणून […]

“न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते”

  आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली. प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले, “न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल. माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका […]

बार-ऍट-लॉ

  त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती. सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही. “अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही […]

“जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये.”

  असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून  समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर […]

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

  जाता जाता मी शिलाला म्हणालो, “म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही.”  हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला […]

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

  एका विद्वान माणसाने मला सांगितलं, “तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.” कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला  लागला की मग मागे वळून बघणार नाही. तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्यादारं खिडक्या लाऊन लोक […]

उलगता बाजार

  “सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.” मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली […]

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी!

ते पिंपळाचं झाड, चिनारी वृक्षापरी खूप दिवसानी मी धामापुरला गेलो होतो.धामापुरातला परिसर अत्यंत सुंदर आहे.लहानपणी मी माझ्या मामाच्या टुमदार घराच्या आजुबाजूला शेतीवाडी असलेल्या परिसरात वेडा होऊन जायचो.जवळच्याच उंच डोंगरातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला सुंदर वाट करून डोंगर्‍याच्या उतारावरून पाट बांधून सपाटी आल्यावर लोकांच्या शेतीला मुबलक पाणी देण्याची सोय करून ठेवली होती.त्यामुळे बारमास शेतीला पाणी मिळायचं.त्याच कारणाने […]