Category Archives: चिंतन

ढगातला खेळ आणि माझे आजोबा.

“मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.” वसंत ऋतुचं आगमन होणार आहे ह्याची चाहूल लागायला लागली आहे.थंडी अंमळ कमी होऊ लागली आहे.मागच्या बागेत तर्‍हेतर्‍हेचे पक्षी येत आहेत.गोड गाणी गाऊन,आवाज करून वसंताच्या आगमनाची आठवण करून देत आहेत. अशावेळी चौपाटीवर जाऊन शांत समुद्राच्या वातावरणात थोडा वेळ घालवावा म्हणून माझ्या […]

दैना आणि गरीबीमधे सामावलेलं सुख आणि आशा.

“सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.” त्याला बरीच वर्ष होऊन गेली असतील.मला आठवतं,मी नव्या मुंबईहून अंधेरीला येत होतो.ती बस डायरेक्ट अंधेरीला जाणारी नव्हती.वांद्रा स्टेशनच्या पूर्वेला जाऊन संपत होती.नंतर वांद्र्याहून ट्रेनने मी अंधेरीला जाणार होतो.माहिमच्या धारावीच्या खाडीजवळ आल्यावर एकाएकी बसचा टायर पंक्चर झाल्याने आम्हाला बसमधून खाली उतरून, येणार्‍या बसमधे जागा मिळेल तसं ती घेऊन […]

माझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटळ आहे.

“जगात अलीकडे मनुष्य जीवनाचा जो विध्वंस चालला आहे ते पाहून मनात येतं की हा जीवनाचा रथ कुठच्या दिशेला चालला आहे.? शे-पाचशे लोकांचा मृत्यु ही रोजचीच बाब झाली आहे. जग अगदी लहान होत चालल्याने जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातली बातमी जणू आपल्या गावातल्या बातमी सारखी वाटू लागली आहे. ही मनुष्य जीवनाची हानी मग ती कुठच्याही धर्माची असो,किंवा कुठच्याही […]

जर,तर,पण,परंतु.

  “माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.” आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला. मी म्हणालो, भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं. ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं […]

मनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.

आज तळ्यावर प्रो.देसायांबरोबर त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रो.गंगाधर तेंडूलकर पण आले होते.ह्यांच नांव मी फार पूर्वी ऐकलं होतं.पण त्यांचा शिकवण्याचा विषय जरा मला जटिलच वाटायचा.पण आता एव्हड्या वर्षानी त्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना सरळच प्रश्न केला, “तेंडूलकरजी,ऍनथ्रुपोलॉजीस्ट म्हणजे काय हो? त्याला मानव-वैज्ञानीक असं म्हणतात एव्हडं मला माहित आहे.तुमची जर हरकत नसेल तर जरा विस्ताराने सांगाल […]

भिंगरी

आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले, “मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे” मी म्हणालो, “भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.? मला जरा फोकस होऊं दे” मला […]

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

  “ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात” आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले, “ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.” तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला […]

विनम्रता

आज प्रो.देसाई ज्यावेळेला तळ्यावर आले त्यावेळी मी एक पुस्तक वाचण्यात गर्क झालो होतो.ते माझ्या जवळ येवून केव्हा उभे राहिले आहेत ते मला कळलंच नाही. मला म्हणाले, “कसल्या विषयात एव्हडे मग्न झाला आहात?” मी त्यांना म्हणालो, “भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.” प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा?” मी म्हणालो, […]

“खेळ खेळूया सारे आपण”

  आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं. मला म्हणाले, “संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही.” मी म्हणालो, “भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला […]

प्रो.देसायांच्या नातवाचं तत्वज्ञान

“पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.” आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो. गम्मत झाली हे म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद […]