Category Archives: लेख

पायताना शिवाय

“अनवाणी असणं आणि त्याचे शारिरीक दृष्टीने काय फायदे ह्या विषयावर मी बरंच वाचन केलं आहे”…मधूसुदन काही लोक स्वभावाने हट्टी असतात.ते त्यांच्या मनात आणतात ते तसं करतात.मला मधुसूदनाबद्दल म्हणायचंआहे.मी त्याला त्याच्या ह्या स्वभावाबद्दल बरेचदा म्हटलं आहे.पण त्याचं म्हणणंही मला पटतं.तो म्हणतो की,मी जो हट्टीपणा दाखवतो त्याने मी माझ्या जीवाला कष्टप्रद करतो.दुसर्‍याला ते कष्ट बघून सहन होत […]

आदर: दिल्या घेतल्याचा.

“मला माझ्या लहानपणीच माझ्या मनावर बिंबवलं गेलेलं होतं की,दुसर्‍याचा सन्मान तसाच करा जसा तुमचा दुसर्‍यानी करावा असं तुम्हाला वाटतं.”…माझा मित्र राजेश. एखादा मनुष्य जेव्हा खरोखरंच हवालदिल होतो तेव्हा तो अगदी खरं बोलण्याचा प्रयत्न करीत असतो.माझ्या ह्या म्ह्णण्याची प्रचिती त्या दिवशी आली जेव्हा राजेश माझा एक मित्र, असेच आम्ही गप्पा मारीत असताना आवर्जून मला सांगत होता. […]

सुरेशच्या आठवणीतला एक दिवस.

“माझीच मला लाज वाटली कारण मी पाहिलं की जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे जीवन खरोखरच सुंदर असू शकतं”. सुरेश जेव्हा हतबल होतो तेव्हा माझ्याकडे येऊन मला सर्व सांगून आपलं मन हलकं करून घेतो.का कुणास ठाऊक मी जरी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून कसलाच प्रतिसाद दिला नाही तरी त्याला त्यात काही हरकत नसते.माझ्या कानावर त्याने घातलं […]

विश्वासराव तत्ववादी

विश्वासराव माझा जुना दोस्त.शाळकरी दोस्त म्हटलं तरी चालेल.त्याला मी गमतीने विश्वासराव तत्ववादी म्हणायचो.आणि त्याचं कारणही तसंच होतं.भेटेन त्यावेळी त्याचं काहीना काहीतरी विषयावरून जीवनात येणार्‍या अडीअडचणीना तोंड कसं द्यावं,जीवन म्हणजेतरी काय असतं,यश-अपयश ह्याचा जीवनात मायना काय असतो अशा काहीतरी विषयावर बोलायला त्याला “लय” आवडायच्या. ह्यावेळी आमची भेट झाली त्यावेळी त्याने मला जीवनातल्या काळा विषयी आपली मतं […]

आशावंत समिर.

“आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.” समिर मनाचा हळवा आहे.तो म्हणण्यासारखा मोठा होईतो त्याला स्वतःचा निर्णय घ्यायची कुवत नव्हती. जरासा जरी मनावर तणाव झाला की बिच्यार्‍याची पंचाईत व्हायची. मला म्हणाला, “माझा हा असला स्वभाव मला माहित होता.जीवनात मोठं मोठं होत असताना,येत असलेले अनुभव […]

थांबून गुलाबाचा सुगंध घ्यावा.

“वर आकाशाकडे पाहून जास्त गहन होऊन बघावं म्हणजे प्रत्येक चांदणी त्या त्या जागी अगदी योग्य वाटूनच बसवली आहे असं भासेल.” “थांबून गुलाबाचा सुगंध घ्यावा.” कधी ऐकलंय का हा वाकप्रचार? श्रीने मला प्रश्न केला. त्याचं असं झालं, जीवन हा एक प्रवास आहे.त्या प्रवासाच्या वाटेत काही घोटाळे पहायला मिळतात,काही तुटलेली नाती पहायला मिळतात तर कधी नवी जोडलेली […]

निसर्ग-वेडा रमाकांत

“जे आपलं खरं स्थान आहे तिथे जायला मुक्ति मिळावी म्हणून, निसर्ग, आपल्याला शांती मिळावी म्हणून, आपल्यात नम्रता आणण्याच्या प्रयत्नात असतो.” निसर्ग-वेड्या रमाकांतला मला बरंच काही सांगायचं होतं.त्या दिवशी तो माझ्याकडे वसंत आणि श्रावण ह्या ऋतुंबद्दल बरंच काही बोलला.आजही त्याने मला आवर्जून सांगीतलं की प्रत्यक्ष निसर्गाबद्दल त्याला आणखी काही बोलायचं आहे आणि ते मी ऐकावं. “प्रत्येकाचा […]

वसंत आणि श्रावण

“वसंत ऋतुतले असेच काही दिवस मला जास्त आवडतात.परंतु, ओलं चिंब करून टाकणारे पावसातले दिवस नक्कीच निराळे असतात.” रमाकांत काही दिवस आपल्या मुलाकडे रहायला आला होता.कोकणातून बाहेर शहरात यायला रमाकांत नाराज असतो.परंतु,ह्यावेळी तसंच काहीसं कारण झाल्याने त्याला त्याच्या मुलाकडे येऊन रहावं लागलं होतं. मला बघून त्याला बरं वाटलं.इथे कंटाळा आला म्हणून मला तो सांगत होता.शहरातला उकाडा […]

अंतरी माझ्या आनंद गवसेना

(अनुवाद) अंतरी माझ्या आनंद गवसेना हसावे असे वाटतां रडावे लागले नीशी दिनीच्या यातना आजही होत्या लपवाव्या असे वाटतां रडावे लागले सांगावे तरी किती काय झाले असावे तुला काही नकळे अन मी अज्ञानी असावे एव्हडे समजले तरी बरेच समजले म्हणावे हसण्याचा बहाणा आणूनी चेहर्‍यावरी सत्य लपवावे असे वाटतां रडावे लागले असे किती असतील तारे नभामधे एक […]

पदयात्रा काढणं.Hike

“मला स्वतःला अशा स्वैर कल्पना,भन्नाड कल्पना करायला आवडेल.” इति सुधाकर सुधाकराला अगदी लहान असल्यापासून hiking ला जाण्याचं वेड लागलं होतं.आणि ही सवय तो त्याच्या मामाकडून शिकला.मामा पाश्चिमात्य देशात शिकला,वाढला आणि मग तिकडून सर्व सोडून देशात परत आला. पदयात्रा काढून निसर्ग सौन्दर्य कसं अनुभवावं,ह्याची गोडी त्याने सुधाकराला लावली. ह्यावेळी मी ठरवलं की सुधाकराला विचारावं ह्या पदयात्रेतून […]