Category Archives: वर्णन

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.

“जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते.” अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती. मला त्यांच्या कविता फारच आवडतात.आशा,लता आणि हृदयनाथानी गायिलेली गाणी तर अप्रतिम आहेत.त्यांच्या कवितेच पुस्तक प्रो.देसायानी त्यांच्याकडे आहे असं मला कधीतरी […]

“आनंदी आनंद गडे!”

आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत. “आम्हाला पाहून तुम्ही समजला असालंच” असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला, “हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी […]

आमचे वेंगुर्ले

वेंगुर्ले वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ “वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले”. वेंग म्हण्जे “कंबर”.म्हणजेच “कंबरेवर ठेऊन उरले ते” प्रेक्शणीय स्थळे बघण्याचा ज्याना नाद आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.रामेश्वर,दत्त,पुर्वस,ताम्बळेशवर,रवाळनाथ अश्या देवाच्या नावाची सुंदर मंदीरे बघायला मिळतील.तांबळेशवर मंदीर डोंगराच्या माथ्यावर आहे.खानोली गावाला जाताना घाटी चढून पाचशे ते सातशे फूट उंचीवर जावे लागते.वाटेत दोनशे ते तिनशे फूटावर तांबळेश्वर […]

मांडकुली एक खेडेगांव

दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बर्याच लोकानी पाहीले नसावे.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवे लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्श असते.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरे पाण्याचे डबके […]