Category Archives: विचार

साध्याश्या गोष्टीतून मौज-मजा

“माणूस गर्भ-श्रीमंत असूनही त्याची आनंददायक बाब अल्पमोलाची असू शकते.” आज सकाळी माझ्या कपात मी कॉफी ओतत होतो.माझ्या नाकाकडे दरवळून येणार्‍या त्या कॉफीच्या सुगंधाबरोबर सहजगत्या,गिळल्या जाणार्‍या त्या कॉफीच्या स्वर्गीय घोटामुळे, होणार्‍या आनंदाची बर्‍यापैकी मौज मी गेली कित्येक वर्ष रोज सकाळी लुटत आलो आहे.कॉफीचा स्वाद घेण्याच्या ह्या सहजचच्या कृतीचा विचार केल्यावर मला लक्षात आलं की ही सामान्य […]

मी आणि माझं लेखन.

का कुणास ठाऊक.काल रात्री प्रो.देसाई माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, “तुम्हाला लेखन करण्यात विशेष असं काय वाटतं?” त्यांच्या ह्या प्रश्नावर मी खो,खो हंसायला लागलो. “हंसू नका,मी गंभीर होऊन तुम्हाला विचारतोय” इती प्रोफेसर. मी पण गंभीर होऊन त्यांना सांगू लागलो, “मला लेखन करण्यात विशेष वाटतं.लॅपटॉप ऊघडलेला,बोटं कीबोर्डच्या कीझवर,विचार वाचकांसाठी आणि लेखनाला प्रारंभ. प्रत्येक क्षणातले मनोभाव,प्रत्येक […]

शांततेबद्दल मला विशेष वाटतं.

“हल्लीच्या काळी जिथे शब्दच एव्हडे व्यक्तिनिष्ठ असतात,जिथे युक्तिवाद झाल्याने आवश्यक परिणाम म्हणून स्पष्टीकरण लगोलग झालंच पाहिजे असं नसतं, तिथे शांततेला खास अर्थ येतो.शांततेच्या पोकळीतच सत्य दडलेलं असतं.” आज प्रो.देसायांना तळ्यावर भेटल्यावर मी म्हणालो, “भाऊसाहेब,सध्या जगात गजबजाटच खूप होत आहे.विमानांच्या आवाजापासून,अतिरेक्यांच्या बॉम्ब फुटण्यापर्यंत कानठिळ्या बसेपर्यंतचे आवाज आहेतच त्याशिवाय रस्त्यावरचे मोर्चे,मिरवणूका,विसर्जनं,सणावारी किंवा आनंद किंवा विजय प्रदर्शित करण्यासाठी […]

जीवनातली सूत्रं.

“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.” वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात.नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते […]

सूड

“होणारे न चुके जरी तया ब्रम्हदेव येई आडवा.” ऍम्सटरडम मधून निघालेली फ्लाईट डिट्रॉइट्ला उतरण्यापुर्वी ते विमान पेटवून लोकांना मारण्याचा कट असफल झाला.ही आजची ताजी आणि बहुचर्चीत बातमी प्रो.देसायांच्या नजरेतून सुटली नव्हती. तेवीस वर्षाच्या सुशिक्षीत (?) व्यक्तीने असं करून कुणाचा सूड साध्य करण्याचा प्रयत्न केला होता कुणास ठाऊक. मला ज्यावेळी आज संध्याकाळी प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा […]

“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.

“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.”   वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे. मी वासंतीला म्हणालो, “तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.” “अगदी बरोबर” वासंती म्हणाली. “मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत […]

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

  आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच. मी त्याना म्हणालो, “भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स […]

प्रो.देसायांबरोबर Q & A

  काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला, “भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?” ते म्हणाले, “तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला […]

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

  काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं  वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो. संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ […]

बालपण देगा देवा!

  “जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”, असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, “त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास   असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत […]