Category Archives: व्यक्ती आणि वल्ली

आप्पा आणि गालावरची खळी.

“रांव रे! आप्पा येतां साईट दी.” (गप्प बस! आप्पा येतोय.(आप्पाची बस येतेय) त्याला जाऊदे.साईड दे) असले उद्गार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगाव किंवा वेगुर्ले-बेळगाव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत. त्याचं असं झालं आप्पाकाकांना धंद्यामधे-बिझीनेसमधे-जास्त दिलचस्पी होती.नाना आजोबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला. आणि आण्णा म्हणाले मुंबईहून मी त्याच्यासाठी(आप्पासाठी) एक नवीन बस (पॅसिंजर व्हेईकल)विकत […]

यमदुता कधी रे नेशिल तूं?

सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून “सॉक,सॉक “असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती. बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी.बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे. हॉस्पिटलमधे इंटरनशिप करीत असताना […]

आमचे मित्र श्रीयुत “मी,माझं,मला”

“मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचंअसावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. ” हे गृहस्थ मला खूप दिवसानी दादरच्या टिळक पूलावर अचानक भेटले.त्यांच नाव जरी चटकन लक्षात आलं नाही तरी त्यांना आम्ही आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमधे राहत असताना आमचे शेजारी म्हणून टोपण […]

“लाख चूका असतील केल्या”

“लाख चूका असतील केल्या” हे गृहस्थ आमचे शेजारी.शिरोडे गावाला जाताना नदी काठी एक टांक नावाचं छोटंस गांव आहे.भाऊ टांककार त्या गांवचे. आमच्या घराच्या बाजुला त्यांचे वखारवजा घर होतं. चांगलं चिरेबंदी भिंतीचं, पुढचा भाग माल ठेवण्यासाठी जरुरी पेक्षा जास्त उंच आणि ऐसपैस, आणि त्याच्या मागे पांच,सहा खोल्या आणि मागे मोठे पोरस,त्यात चार पाच माडाची फळ देणारी […]

बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत

बॉम्बेचे मुंबई आणि मधुकर सामंत ” बंबई, बॉम्बे ” ज्याला म्हणत होते,त्याला आता ” मुंबई ”  किंवा स्टाईलमधे काही लोक हल्ली ” मुंबाय ” म्हणतात त्या मुंबापुरीला मुळ मुंबादेवी ह्या देवीच्या नांवावरून बहुतेक मुंबई असे नांव आले असावे. माझा मोठा भाऊ ह्या नामकरणाला कसा कारणीभूत झाला ही एक गंमतीदार गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे.खरं म्हणजे […]

रामभाऊ गणेश माळगी

रामभाऊ गणेश माळगी “रामभाऊ” असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला ” रामा” म्हणायचे तर कुणी त्याला ” रे,रामा ” अशी साद घालायचे कुणी ” रामा रे ” असं पण म्हणायचे.सर्व साधारण त्याला “रामा” च म्हणायचे. तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले […]

सबनीसांचा वसंता

सबनीसांचा वसंता आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणूनच हांक ऐकण्याची संवय झाली होती. हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत. […]

भाली

भाली खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया […]

दाजी “पोष्टमन”

दाजी “पोष्टमन” भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली. दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली. भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार. दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे […]

भास्करभाऊ

भास्करभाऊ शिवराम सखाराम प्रभू (आजगांवकर) ऊर्फ भाऊ आजगांवकर हे माझ्या आईचे लांबचे भाऊ.आईच्या माहेरी त्यांच्या राहात्या घराच्या आजूबाजूला पण बरीच घरे होती त्यातपण अनेक आजगांवकर राहात.त्यापैकी हे एक आणि त्यांचेच नातेवाईक समजले जाते एव्हडेच. आईच्या वडिलानी तिला त्यावेळी(१९३०) तिन हजार रुपये वेंगुर्ल्यात घर घेण्यासाठी दिले होते त्यात भर म्हणून आपले हजार रुपये घालून एका सोनाराचे […]