Monthly Archives: ऑक्टोबर 2008

मुलीला आपली आई माहित हवी.

  रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते. असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं, ” असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?” त्यावर ती म्हणाली, “आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान […]

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

  रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे. ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद […]

निःशब्द होता सारा परिसर

जहाली असता अर्धी रात्र निःशब्द होता सारा परिसर दाहलेल्या मनाची ऐका रंजलेली ही नीतिकथा धुमसलेले उश्वास येती वणव्यातून चांदण्या सांगती डोळे मिचकावून लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल नसे तसे काही जाहले त्या धरतीवर गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर […]

“मेल्यावर जीवाचं काय होतं?”

  माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे. ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं. एक दिवशी […]

आम्ही बाराक ओबामाला मत देऊन पण टाकलं.

  “अजून ४ नोव्हेंबर उजाडायचा आहे.तो मतदानाचा दिवस आहे मग त्या अगोदर मत देणं कसं शक्य आहे?”  असं आपण म्हणाल.पण खरं सांगू हीच तर अमेरिकेत गम्मत आहे.इथे स्वातंत्र्याला सिमा नाही.मात्र फक्त ते सर्व कायद्दात असलं पाहिजे.हम करे सो कायदा नाही चालत.आणि तसा काही अन्याय वाटला तर जा कोर्टात  आणि मांडा तुमची कैफियत.कोर्टपण तत्पर असतं.लगेचच निर्णय. […]

“लळा जिव्हाळा शब्दच मोठे कोण कुणासाठी जगते”

 “रामभाऊ” असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला ” रामा” म्हणायचे तर कुणी त्याला ” रे,रामा ” अशी साद घालायचे कुणी ” रामा रे ” असं पण म्हणायचे.सर्व साधारणपणे लोक त्याला “रामा” च म्हणायचे. तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना, त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले,  “हा माझा […]

“माझी आई हाच माझा विश्वास.”

मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर “माझी आई हाच माझा विश्वास.” ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो. कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉपहोता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस […]

नवजात मुलाबद्दलच्या आईच्या अपेक्षा.

  आज नंदा पेठे आणि तिची मैत्रीण कविता भिडे दोघी तळ्यावर फिरायला आलेल्या दिसल्या.मला पाहिल्यावर नंदा म्हणाली की, ” भाऊसाहेबांना आज बरं नसल्याने ते येऊ शकणार नाहित.”  तसा त्यानी तिच्या जवळ मला निरोप दिला होता. नंदा ही प्रो.देसायांची मधली मुलगी.कविता एका कम्युनीकेशन सेंटरवर काम करते.माझी तिच्याशी ओळख करून दिल्यावर नंदा मला म्हणाली, “कविताला एक लहान […]

सुप्त राहाणार्‍या प्रतिभेचा इतिहास.

 मला वाटतं,आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं,आपल्यात परिवर्तन होत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याल जोडून ठेवीत असतं.  मी एकदा व्हि.जे.टि.आय.कॉलेज मधे माझ्या एका पूर्वीच्या सहकार्‍याला भेटायला म्हणून गेलो होतो.तो सिव्हिल इंजीनियरींग डिपार्टमेन्ट मधे प्राध्यापक म्हणून काम करीत होता.त्याने मला तिकडेच रमेश चव्हाण नावाच्या त्याच्या […]

एका मनीमाऊचा किस्सा

  आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले, “गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे. आमच्या शेजार्‍यांचे ते […]