हसण्यावर माझा विश्वास आहे.

मला माझे शाळेतले दिवस आठवतात.आम्हालासंस्कृत शिकवणारे शिक्षक फार कडक वाटायचे.एकदा एका पिरयडला वर्गात हसूं येण्यासारखा प्रसंग घडला.सहाजिकच आमच्या गंभीर शिक्षकांना हसणं आवडलं नाही असं दिसलं.आम्ही सर्व गंभीर चेहरा करून गप्प झालो.शिक्षकानां गुरूनाथ तरीही हसत आहे हे आवडलं नाही.त्यांनी त्याला वर्गाबाहेर जायलासांगितलं.गरीब स्वभावाचा तो,वाद न घालणारातो निमूटपणे बाहेर जाऊन उभा राहिला.
आम्हा सर्वांना खूप वाईट वाटलं.गुरूनाथाचे दांत थोडे पुढे असल्याने त्याचाचेहरा नेहमीच हसरा दिसतो.पण हे शिक्षकांनासांगणार कोण?

सर्व मुलं गंभीर चेहरा करून असतांना,तो हसत होता,हा शिक्षकांचा गैरसमज झाला.दुसऱ्या दिवशी त्यांना इतर शिक्षकांकडूनकळलं, तेव्हा त्यांनी गुरूनाथाला जवळ घेऊन त्याची माफी मागितली.सांगण्याचा उद्देश एव्डडाच की, हसूंचा किंवाहासण्याचा प्रभाव कसा पडतो हे विशदकरण्यासाठी वरील उदाहरण देत आहे.

हसण्यावर माझा विश्वास आहे.ही सवय एक प्रकारची आपल्या शरिराला दायित्व देते.ह्या सवयीमुळेल आपले सर्व व्यवहार चोख चालत असतात.ही सवय आपल्याला समजदार रहाण्यासाठी ऊद्यूक्त करते.शिवाय कठीण प्रसंगातून तरून नेते.ही सवय दुखाःवर एक प्रकारचा जालिम उपाय आहे.हसणं कधी कधी आपल्याला अशा परिस्थितित आणून सोडतं की आपल्याला श्वास घेणं पण कठीण होतं.ही एक प्रकारची निसर्गाकडून,आपली प्रक्रुती स्वस्थ ठेवण्याची सोय आहे.हसणं ही सवय कदाचित निसर्गाची शरिराला व्याधीतून मुक्त करण्याची प्रक्रिया असेल.

मला आठवतं एकदा माझा मोठा भाऊ काही विनोद सांगत होता त्यावर मला एव्हडं हसूं येत होतं की,मला श्वास घेणं कठीण झालं होतं.परत थोड्यावेळाने त्याचे विनोद ऐकू लागलो तेव्हा पुन्हा हसूं येऊ लागलं होतं.हसण्याच्या सवयीने आपल्या खर्‍या अस्थीतत्वाचं एकप्रकारचं आपण अनावरण करीत असतो.अशावेळी तुमचा चेहरा कसा दिसतो ह्याची,आणि काही काळ सतत हसत राहिल्यावर पोट एव्हडं गच्च होतं त्याचीही तुम्ही पर्वा करीत नसता.हसण्यामुळे आपली स्मरणशक्ती जास्त मजबूत होत असते.आठवण येऊन येऊन पून्हा हसू कधी कधी आवरत नाही.कधी क्धी आठवण येऊन आपण एकटेच हसत हसतो आणि बरोबरच्या व्यक्तीला हा वेडेपणा वाटतो.आणि तो सर्व प्रकार त्या व्यक्तीला सांगत असताना आणखी हसूं येऊन ती व्यकतीसुद्धा आपल्या बरोबर हसूं लागते.अशा तर्हेने हे हसणं एखाद्द्यावर हसण्याचा दबाव आणतं.

माझ्या बहिणीच्या लग्नात आम्ही सर्व जमलो असताना विनोदाची एव्हडी खैरात झाली होती की त्या प्रसंगाची आठवण काढून,अआम्ही कधी एकमेकाला भेटलो आणि लग्नाचा विषय आला तर नकळत खो,खो हसतो.हसू आवरत नाही.

हसण्याची स्मरणशक्ती एव्हडी कायमस्वरूपाची रहात असते.ज्याना हसूं येत नाही ते आपला सर्व गर्व हरवून बसलेले असतात असं मला वाटतं.एखादी व्यक्ती दुरमुखलेली असेल तर तीच्याशी संवाद साधून झाल्यावर तीला एखादा हलका विनोद सांगून हसवण्याचा प्रयत्न करावा,आणि आपण हसता हसता ती व्यक्ती हसताना पाहून त्या व्यक्तीत काय स्थित्यंतर आपण करून गेलो याची कल्पनासुद्धा येणार नाही.

माणसाच्या अंगात ज्या वेगवेगळ्या भावना असतात त्यात हसूं ही प्रमुख भावना असते. आणि ते हसूं परत परत येत रहातं.मी पुढे जाऊन म्हणेन की हसूं हे एक असं औषध आहे की त्याची गोळी आपल्याला सतत घ्यावी लागते.आणि त्या औषधाचा ओव्हर डोझ कधीच होत नाही.

हसूं हे एक, रात्री झोपण्यापूर्वीची भावना आहे जी, आपल्याला कधी कधी झोपू देत नाही.ती दीर्घकाळ राहू शकते.माझ्या गमंतीच्या हसण्याच्या वेळा रात्रीच्याच असतात.कदाचित रात्रीची शांत वेळ मला उद्द्युक्त करत असेल.

एकदाची गोष्ट मला आठवते.ती पण रात्रीची वेळ होती.माझा बरोबरोबरचा मित्र एका कंपाउन्डच्या फेन्सवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात होता.ते करत असताना तो वर अडकला.
त्याला मदत करायची सोडून मला हसूं आवरेना,ओरडून तो मला मदत करायला सांगत होता.
मला म्हणायचं आहे की हसूं कधी कधी असं निर्दयी असूं शकतं.जरी आपल्या मनात तसं निर्दयी व्हायचं नसतं.
कधी कधी हसूं अगदी अवेळी येऊं शकतं.अगदी एखाद्या स्मशानात,किंवा एखादा बिचारा आपल्या मैत्रीणंचं भांडण विषद करीत असताना.

हीच तर हसण्याची गम्मत आहे.हे हसूं तुमच्या मनात गुपचूप कधी शिरकाव करील ते सांगता येणार नाही.हसूं हे कधी कधी तुमचं शत्रू होऊं शकतं.कुणालाच आपलं हसं होत आहे हे पाहायला आवडणार नाही.पण ह्यातच तुमचं कसब आहे की,त्यातून तुम्ही तुमचा बचाव करूं शकता.स्वतःवरच हसायला काहीच हरकत नसते.आपलं आयुष्य एव्हडं करकचून बांधून ठेवता येत नाही की ज्यमुळे आपण जीवनात हसूंच आणूं शकत नाही.मी तरी बुवा हंसणं आवश्यक आहे असं मानतो.कारण ते जीवनाला दहापट चांगलं करू शकतं. तुम्ही अशा ठिकाणी आसाल की तुम्हाला श्वासही घेता येत नाही तरी हसावं लागल्यास हंसं आपला पाठपुरावा सोडत नाही म्हणून हसत,हसत म्हणतो,
हसा,हसा आणि व्यायाम करा.

One Comment

  1. अमोल
    Posted ऑगस्ट 10, 2023 at 10:04 सकाळी | Permalink

    अगदी
    लोटपोट हसण्याचे सगळे प्रसंग लक्षात आहेत. तो प्रसंग घडलेला असताना जे लोक होते ते भेटले आणि परत त्या प्रसंगाचा विषय निघाला की अजून पण तेवढेच हसू येते.
    तुमच्या जुन्या आठवणी, कोकणातली निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे नक्की लिहा.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*