पाहुनी तुझे हास्य हसेल दुनिया सारी

(अनुवाद)

पाहुनी तुझे हास्य हसेल दुनिया सारी
पाहुनी तुझे रुदन कुणीही रडणार नाही
पाहूनी तुझी आंसवे काही उमजणार नाही
पाहूनी तुझी आंसवे हसतील मात्र सारे

सूर्याच्या किरणानी जागी जाहली सकाळ
दीपकाच्या हसण्याने दूर झाला अंधक्कार
झगमगत रहा गुणगुणत रहा
जीवनात सदा हसत हसत रहा
तुझे पाहुनी हास्य हसेल दुनिया सारी
तुझे पाहुनी रुदन कुणीही रडणार नाही

हसली कळी अन फुलही हसले
फुलाच्या हसण्याने दृश्य सुंदर दिसले
सुंदर हसणे दृश्याचे पाहून
हसले नभातील चंद्र अन चांदणे
पाहुनी तुझे हास्य हसेल दुनिया सारी
पाहुनी तुझे रुदन कुणीही रडणार नाही

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलीफोरनीया)

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*