कसा सुटेल मिलाप हाताचा

कुठे गेले तुझे ते वचन
ती शपथ अन् ते परिवर्तन

ज्या दिवशी विसरेल मन
अखेरचे होणार तुझे जीवन

कुठे गेले ते तुझे वचन

स्मरण आहे मला अजूनी
तुझे म्हणणे होते यद्दपी
रूसणार नाही कदापि

मिलाप झाला आहे मनाचा
कसा सुटेल मिलाप हाताचा

संपते संध्या तुझ्या केशपाशात
नसेल कसे हे माझ्या स्मरणात

कुठे गेले तुझे ते वचन
ती शपथ अन् ते परिवर्तन

ज्याने केला सदैव सौदा प्रेमाचा
नशा संपत्ती कारण विस्मरण्याचा

कुठे गेले तुझे ते वचन
ती शपथ अन् ते परिवर्तन

ज्या दिवशी विसरेल मन
अखेरचे होणार तुझे जीवन

कुठे गेले ते तुझे वचन
ती शपथ अन् ते परिवर्तन

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*